
no images were found
एअरटेलने जगभरात प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी परवडण्याजोगे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स लाँच केले
नवी दिल्ली , : भारती एअरटेल (“एअरटेल”) भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आणि आज तिने परदेशात प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी परवडणारे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स सादर केले आहेत. नवीन पॅक्सची 184 देशांमध्ये उपलब्धता आहे आणि त्यांचे दर हे रु. 133/दिवस पासून सुरू होतात, ज्यामुळे स्थानिक सिम्सच्या तुलनेत ते परवडणारे पर्याय बनतात. याव्यतिरिक्त, ते वाढीव डेटाचे लाभ, फ्लाइटच्या आत कनेक्टिव्हिटी आणि 24×7 संपर्क केंद्र समर्थन उपलब्ध करून देतात.
शक्य तेवढ्या सोयीस्कर पद्धतीने गोष्टी करता याव्यात म्हणून एअरटेलने या 184 देशांमध्ये प्रवास करणाऱ्या ग्राहकांना यापुढे विविध प्रवास करणाऱ्या ठिकाणांसाठी अनेक पॅक्सना सबस्क्रायब करावे लागणार नाही आणि एकाच पॅकच्या माध्यमातून जगात कुठेही प्रवासाचा कालावधी निवडण्याची आणि अखंड कनेक्टिव्हिटीचा आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे; आणि हे सर्वात किफायतशीर पद्धतीने केले गेले आहे.
अमित त्रिपाठी संचालक – ग्राहक अनुभव आणि विपणन भारती एअरटेल म्हणाले की, “ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे आणि अधिक सुविधा प्रदान करण्याचे ध्येय आम्ही एअरटेल मध्ये ठेवलेले आहे. आम्ही आनंदाने परवडण्याजोगे आणि सोपे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक्स लाँच करत आहोत. हे पॅक्स जगात कोठेही प्रवास करणाऱ्या ग्राहकांना विनाअडथळा रोमिंग उपलब्ध करून देतील. पॅक्स बऱ्याच देशांमधील स्थानिक देशांतर्गत सिम्सच्या तुलनेत किफायतशीर असून वाढीव फायदे उपलब्ध करून देऊन अधिक मूल्य देऊ करत आहेत. नवीन पॅक खरोखरंच ग्राहकांसाठी आमच्या मूल्य प्रस्तावाची पुनर्व्याख्या करत आहे आणि त्यांना परवडणाऱ्या दरात डेटा आणि व्हॉइस वापरण्याचे स्वातंत्र्य देत आहे. “