Home शासकीय  कोल्हापूर, हातकणंगले उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे केली दाखल  

 कोल्हापूर, हातकणंगले उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे केली दाखल  

4 second read
0
0
53

no images were found

 कोल्हापूर, हातकणंगले उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे केली दाखल

 

कोल्हापूर  : मंगळवारी दि. 16 एप्रिल रोजी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 2 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू शहाजी छत्रपती (पक्ष -इंडियन नॅशनल काँग्रेस) 3 अर्ज व अपक्ष मधून 1 अर्ज अशी 4 नामनिर्देशनपत्रे तर संदिप नामदेव शिंदे (पक्ष – बहुजन समाज पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल केले.

 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी सत्यजित बाबासो पाटील (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दोन अर्ज, रवींद्र तुकाराम कांबळे (पक्ष – बहुजन समाज पार्टी) एक अर्ज, शिवाजी विठ्ठल माने (अपक्ष) एक अर्ज, मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष) एक अर्ज व रघुनाथ रामचंद्र पाटील (अपक्ष) एक अर्ज अशा पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्रे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल केली आहेत.

नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 5 इच्छुक उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्रे तर 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्रे घेतली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…