Home सामाजिक वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडचा अमेरिकी बाजारपेठेत विस्तार

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडचा अमेरिकी बाजारपेठेत विस्तार

4 second read
0
0
31

no images were found

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडचा अमेरिकी बाजारपेठेत विस्तार

कोल्हापूर  : वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडला अमेरिकी बाजारपेठेत प्रवेश करत असल्याचे जाहीर करताना आनंद होत असून कंपनीने युएसएफडीए नोंदणी संपादन केली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या प्रवासातील लक्षणीय टप्पा असून त्यातून दर्जेदार खाद्यपदार्थ जगभरात उपलब्ध करण्याची कंपनीची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या उत्पादन श्रेणीच्या विविधतेचा विस्तार करण्यात आला असून त्यात आरटीई (रेडी-टु-ईट) मील्स, फ्रोझन उत्पादने, मसाले, सॉसेस, काँडीमेंट्स आणि पेयं यांचा समावेश आहे.

नवीन आर्थिक वर्ष २४- २५ च्या पहिल्या तिमाहीपासून वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड अमेरिकेत निर्यातीस सुरुवात करेल. सुरुवातीच्या टप्प्यात न्यू जर्सी, टेक्साससह महत्त्वाच्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जाणार असून तिथल्या ग्राहकांना भारतातील समृद्ध खाद्ययात्रेचा अस्सल अनुभव घेणे शक्य होईल. सोयीस्कर आरटीई (रेडी-टु-ईट) मील्सपासून रूचकर फ्रोजन उत्पादने, सुगंधित मसाले, चविष्ट सॉसेस, वैविध्यपूर्ण काँडीमेंट्स आणि ताजेतवाने करणारे बेव्हरेजेस यांचा समावेश असलेली कंपनीची उत्पादन श्रेणी अतिशय बारकाईने प्रत्येक आवडनिवड पुरवण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे.

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव म्हणाल्या, ‘चोखंदळ चव आणि उच्च मापदंड यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकी बाजारपेठेत आमची उत्पादने निर्यात करण्याची सुरुवात करताना आम्ही भारावून गेलो आहोत. यावरून जगभरातील ग्राहकांना अस्सल भारतीय चव मिळवून देण्याची आमची अविरत मेहनत अधोरेखित होते. युएसएफडीए नोंदणी आमची बांधिलकी, उत्पादनाचा दर्जा आणि नियम पालनाला मिळालेली पावती आहे. या प्रमाणपत्रामुळे आमच्या उत्पादनांचा असामान्य दर्जा आणि खाद्य सुरक्षाविषयक मापदंडांचे कठोर पालन करण्याची आमची वृत्ती ठळकपणे दिसून आली आहे. यामुळे ग्राहक व भागधारकांमध्ये अतूट विश्वास निर्माण होईल.’

कंपनीने बारकाईने आखलेल्या बाजारपेठ विस्तार धोरणाचा एक भाग म्हणून वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने धोरणात्मक भागिदारी केली आहे. या भागिदारीमुळे अमेरिकी ग्राहकांना उत्पादनांचे सुरळीतपणे वितरण होण्यास मदत होईल. अमेरिकी बाजारपेठेत कंपनीचा झालेला प्रवेश विकासाची लक्षणीय संधी देणारा आणि जगभरातील चोखंदळ ग्राहकांच्या बदलत्या गरजा पुरवण्याची बांधिलकी दर्शवणारा आहे.

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडसा प्रिझर्व्हेटिव्ह्ज, एमएसजी आणि कृत्रिम खाद्य रंगांपासून मुक्त आरईटी व फ्रोझन उत्पादने सादर करताना अभिमान वाटतो. रिटेल वितरण आणि खासगी लेबलिंगवर लक्ष केंद्रित करत आम्ही उच्च दर्जा आणि चव असलेली उत्पादने अमेरिकी बाजारपेठ व इतरत्र उपलब्ध करण्यासाठी बांधील आहोत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …