
no images were found
स्कोडा ऑटो इंडिया कडून नव्या युगाला चालना देण्यासाठी डिजिटलायझेशन धोरणामध्ये वाढ
स्कोडा ऑटो इंडियाने त्यांच्या ऑल-न्यू कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या घोषणेसह न्यू एरामध्ये प्रवेश केला आहे. युजर सहभाग, ग्राहकांचा सहभाग व डिजिटलायझेशनसह न्यू एराच्या दिशेने वाटचाल करत कंपनीने अनेक सर्वांगीण डिजिटल उपक्रम लाँच केले, ज्यामध्ये उल्लेखनीय विक्री टप्पा संपादित करण्यात आला आणि ग्राहकवर्ग व चाहत्यांपर्यंतची पोहोच वाढवण्यात आली.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, विकसित होत असलेले डिजिटल लँडस्केप, व्यासपीठ व माध्यमांसह ग्राहकांचा अनुभव व प्रवासामध्ये सुधारणा करण्याच्या नवीन मार्गांमध्ये अग्रस्थानी असणे आवश्यक आहे. आमची डिजिटल धोरणे आमची उत्पादने व सेवा ग्राहक व चाहत्यांपर्यंत त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये पोहोचण्याची खात्री घेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
नेम युअर स्कोडा
या मोहिमेने स्कोडाचे वापरकर्ते, ग्राहक व चाहत्यांचा सहभाग वाढवत २०२५ मध्ये रस्त्यावर धावताना पाहायला मिळणाऱ्या स्कोडा ऑटो इंडियाच्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी नाव सुचवण्यास सक्षम केले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १,५०,००० हून अधिक नावांच्या सूचना मिळाल्या आहेत, ज्यापैकी २१,००० हून अधिक अद्वितीय नाव आहेत. या प्रवेशिका स्कोडाच्या सर्व इंटर्नल कम्बशन एसयूव्हींना ‘के’ अक्षरासह सुरूवात होत ‘क्यू’ अक्षरासह शेवट होणाऱ्या एक किंवा दोन शब्दांचे नाव देण्याच्या परंपरेशी बांधील राहिल्या.
२४ तास. २४ वर्ष. २४ मार्च. २०२४
स्कोडा ऑटो इंडियाने देशातील आपल्या उल्लेखनीय क्षणाला देखील साजरे केले. डिसेंबर १९९९ मध्ये भारतात कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या क्षणाला साजरे करण्यासाठी ब्रँडने विशेषत: डिजिटल व्यासपीठांच्या माध्यमातून २४ मार्च, २०२४ रोजी फक्त २४ तासांकरिता अनेक ऑफर्स सादर केल्या. या उपक्रमांतर्गत २४ तासांच्या आत ७०९ कार्सचे बुकिंग्ज करण्यात आले. कंपनीच्या ‘स्कोडा फॉर एव्हरीवन’प्रती मिशनला अधिक दृढ करत हा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्राहकांना ब्रँड स्कोडासोबत कनेक्ट करतो