
no images were found
पू बनी पार्वतीः भूमिकेसाठी माएरा मिश्रा आता ड्रेसेसच्या ऐवजी नेसणार साडी
झी टीव्हीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ आपल्या रोचक कथानकासह गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मी ऐश्वर्या खरे आणि रिषी रोहित सुचांति यांच्या आयुष्यातील चढउतारांसह मनोरंजन करत आहे. हल्लीच ह्या शो ने 7 वर्षांची झेप घेतली असून प्रेक्षक आता रिषी आणि लक्ष्मी यांचा जीवनप्रवास पाहत आहेत. हे दोघेही आपापल्या मुलांसह विभक्त राहत आहेत. हल्लीच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले की कसे अख्खा परिवार होळी सेलिब्रेशन्समध्ये व्यस्त असतो आणि मलिष्का माएरा मिश्रा ओबेरॉय हाऊसमध्ये अगदी नवीन अवतारात पुनरागमन केले आहे.
सुंदर डिजाईनर पोशाख आणि सुबक दागिन्यांसह माएरा ऊर्फ मलिष्काचा फॅशन गेम नेहमीच ऑन पॉईन्ट असतो. आता झेपेनंतर ती आता सुंदर साड्या नेसून केसांचा व्यवस्थित अंबाडा बांधून आणि कपाळावर टिकली अशा पूर्णपणे नवीन अवतारात दिसून येईल. आपल्या ह्या लूकला बदलण्यासाठी माएरा अतिशय उत्साहात असून आपल्या खासगी आयुष्यातही तिला आपले पोशाख आणि दागिन्यांसह वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. त्यामुळे मालिकेतील हा बदल ति च्य भूमिकेसाठी अगदी ताजातवाना करणारा आहे.
माएराम्हणाली, “मी ह्या मालिकेत प्रवेश केल्यापासून मी नेहमीच आधुनिक आणि डिजाईनर पोशाख घालून आहे. त्यामुळे ह्या झेपेसह मला अगदी नवीन अवतारासह माझ्या लूकसोबत प्रयोग करायला मिळत आहे. साडी नेसणे हे मलिष्कासाठी अतिशय महत्त्वाचा बदल आहे, जसं पू बनी पार्वती. मला वाटतं साडी नेहमीच अतिशय सुंदर आणि मोहक दिसते. साधारणपणे खऱ्या आयुष्यात रोज साडी नेसायला जमत नाही, पण माझ्या ह्या लूकमधील बदलासह मला तो ही अनुभव मिळत आहे. माझी क्रिएटिव्ह टीम माझी खूप मदत करते आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही अनेक सुंदर लूक्स डिजाईन केले आहेत आणि ते प्रेक्षकांनी ऑनस्क्रीन पाहावेत यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.” माएरा आता मलिष्काच्या नवीन प्रवासावर निघण्यासाठी सज्ज आहे, आणि रिषीच्या आयुष्यात पुन्हा एकदा तिला नाट्यमय वळणे आणताना पाहणे रोचक ठरेल.