no images were found
आसिफ शेख आणि विदिशा श्रीवास्तव यांनी वाराणसीला भेट देत दिला जुन्या आठवणींना उजाळा!
एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील लोकप्रिय ऑन-स्क्रिन जोडी विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) आणि अनिता भाबी (विदिशा श्रीवास्तव)यांनी नुमकतेच भारतातील प्राचीन शहर वाराणसीला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विदिशा यांच्यासाठी वाराणसीचे भावनिक महत्त्व आहे, जेथे त्यांनी त्यांचे बालपण व किशोरवयीन काळ व्यतित केला आहे. तसेच, आसिफ यांनी तरूणपणी येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराला वारंवार भेट दिली आहे. या ट्रिपदरम्यान त्यांनी शुभ महाशिवरात्री सणादरम्यान पवित्र श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन भगवान शिवाचा आशीर्वाद घेतला. याव्यतिरिक्त, या जोडीने वाराणसीमधील पवित्र घाटला भेट दिली, उत्साहवर्धक बोट राइडचा आनंद घेतला आणि स्वादिष्ट स्थानिक पाककलांचा आस्वाद देखील घेतला. त्यांच्या मालिकेने नऊ वर्षे पूर्ण केली आहेत, ज्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी ही भेट दिली होती, तसेच त्यांनी गोड आठवणींना उजाळा देण्यासह वाराणसीच्या नयनरम्य भागांमध्ये फेरफटका मारण्याचा आनंद घेतला.
जुन्या आठवणींना उजाळा देत आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्राम्हणाले, ”जवळपास दशकानंतर माझ्या मूळगावी परतण्याचा अनुभव अत्यंत उत्साहवर्धक होता. मी वाराणसीमधील श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन भगवान शिवचा आशीर्वाद घेतला, जो अत्यंत भावनिक अनुभव ठरला. बनारसमधील जुन्या गल्ल्यांमधून चालत असताना माझ्या मनात जुन्या आठवणी निर्माण झाल्या. काळासह तेथे बदल झाला असला तरी शहरामध्ये फेरफटका मारताना माझा जीवनप्रवास दिसून येत होता. वातावरण अत्यंत उत्साहवर्धक होते, ज्यामध्ये काळासह कोणताच बदल झाला नव्हता. सायंकाळच्या वेळी गंगा नदीमध्ये बोट राइडचा आनंद लक्षवेधक होता, जेथे मनमोहक सूर्यास्त पाहायला मिळाला. पहिल्यांदाच सायंकाळच्या वेळी गंगा आरती पाहायला मिळाली, जो माझ्यासाठी आध्यात्मिक अनुभव होता आणि सदैव माझ्या स्मरणात राहिल. वाराणसीची आणखी एक खासियत म्हणजे स्वादिष्ट पाककला. प्रत्येक पाककलेमधून मला उत्तम स्वादाचा अनुभव मिळाला. चटपटीत चाटपासून प्रतिष्ठित ‘पेहलवान लस्सी’ येथील स्वादिष्ट लस्सी व रबडीपर्यंत प्रत्येक डिशमधून शहराच्या संपन्न वारसाचा अनुभव मिळाला. आणि अर्थातच प्रसिद्ध बनारसी पान संस्मरणीय अनुभव देते आणि निश्चितच वाराणसीमधील सर्वोत्तम पाककला अनुभव आहे.” शहरामध्ये फेरफटका मारण्याबात सांगताना विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबीम्हणाल्या, ”मला यंदा पुन्हा एकदा माझ्या मूळगावाला भेट देण्याची संधी मिळाली. मी ‘महाशिवरात्री’च्या शुभप्रसंगी श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. या ट्रिपमध्ये माझ्यासोबत माझे कुटुंबिय व सह-कलाकार आसिफ शेख सोबत होते, ज्यामुळे ट्रिप अत्यंत उत्साहवर्धक व संस्मरणीय ठरली. मी अत्यंत फूडी असल्यामुळे माझ्या कुटुंबियांसोबत आमच्या आवडत्या ठिकाणी माझी आवडती लस्सी, रबडी, मलायो व चाटचा आस्वाद घेतला. गंगा घाटवर फेरफटका मारण्याचा आणि अस्सी घाटवर बोट राइडमधून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव उत्साहवर्धक होता. सायंकाळच्या वेळी गंगा घाटवर केली जाणारी आरती संस्मरणीय व आध्यात्मिक ठरली. बनारसमध्ये गेल्यानंतर पवित्र गंगा नदीवर बोट राइडिंगचा आनंद घेतला पाहिजे. शहर सोडून जात असताना मी काहीसे भावूक झाले. मी या ट्रिपदरम्यान गोड आठवणी साठवल्या. आणि मी पुन्हा एकदा बनारसला जाणार आहे.”