Home मनोरंजन नवीन एंट्री: पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत ज्येष्ठ अभिनेता मनीष खन्ना वकिलाच्या भूमिकेत दिसणार

नवीन एंट्री: पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत ज्येष्ठ अभिनेता मनीष खन्ना वकिलाच्या भूमिकेत दिसणार

10 second read
0
0
27

no images were found

नवीन एंट्री: पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत ज्येष्ठ अभिनेता मनीष खन्ना वकिलाच्या भूमिकेत दिसणार

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पा पटेल (करुणा पांडे)ची गोष्ट सांगितली आहे, जी एक कष्टाळू आणि चिवट स्त्री आहे, जी अनेक अडचणींना धीराने तोंड देत असते. अलीकडच्या घडामोडीत दिलीप पटेल (जयेश मोरे) ची हत्या केल्याच्या आरोपावरून जुगल (अंशुल त्रिवेदी) ला तुरुंगात टाकण्यात आले आहे. जुगलला वाचवण्यासाठी पुष्पाने आपली मेंटर, वकील देवी (उर्वशी धोळकिया) हिची मदत घेतली आहे. पण जुगलला आरोपातून सोडवणे हे सोपे काम असणार नाही, कारण त्यासाठी तिला सोमनाथ सूर्यवंशी (मनीष खन्ना) या कुख्यात वकिलाशी लढावे लागणार आहे.

नकारात्मक भूमिकांबद्दल ओळखला जाणारा मनीष खन्ना हा अभिनेता लवकरच ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत विरोधी पक्षाच्या, दिल्लीहून आलेल्या वकिलाच्या रूपात दिसणार आहे. भारदस्त व्यक्तिमत्व आणि जोडीला वेधक आवाज यांच्या जोरावर सोमनाथ कोर्टरूममध्ये येताच विरुद्ध पक्षाच्या मनात भीती निर्माण करतो. त्याची तल्लख बुद्धी, चलाखी आणि भीती निर्माण करणारी उपस्थिती हे सोमनाथच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण आहेत. आपल्या हुशारीने सर्वांवर कुरघोडी करण्याची खबरदारी तो घेतो. कायद्याची ताकद त्याला वापरता येते आणि त्याच्या आधारे तो भीती आणि आपला दरारा निर्माण करतो.

सोमनाथ सूर्यवंशीची भूमिका करत असलेला अभिनेता मनीष खन्ना म्हणतो, “पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत काम करताना मला आनंद होत आहे. मी साकारत असलेली सोमनाथची व्यक्तिरेखा आकर्षक आहे. त्याचे बोलणे धारदार असते आणि बोचरी विधाने करायला तो कचरत नाही. ही एक संपूर्णपणे नकारात्मक आणि इतरांच्या मनात भिंती निर्माण करणारी व्यक्तिरेखा आहे. त्याच्या केवळ कृतीच नाहीत तर त्याच्या लकबी देखील भीतीदायक आहेत. आम्ही या व्यक्तिरेखेत काही बारकावे टाकले आहेत, ज्यामुळे ते पात्र आणखी रोचक झाले आहे. आपल्या पेनने टकटक आवाज करण्याची आणि तुच्छतेने एक भुवई उंचावण्याची त्याला सवय आहे.मला वाटते प्रेक्षक या पात्राचा तिरस्कार करतील. त्याच्या आगमनामुळे पुष्पाच्या जीवनात आणखी आव्हाने येणार आहेत.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…