Home मनोरंजन  ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत जुगलला झालीअटक: पुष्पा आणि देवी त्याला वाचवू शकतील का?

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत जुगलला झालीअटक: पुष्पा आणि देवी त्याला वाचवू शकतील का?

8 second read
0
0
19

no images were found

 पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत जुगलला झालीअटक: पुष्पा आणि देवी त्याला वाचवू शकतील का?

 

सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पा पटेल (करुणा पांडे)ची गोष्ट सांगितली आहे, जी एक कष्टाळू आणि चिवट स्त्री आहे, जी अनेक अडचणींना धीराने तोंड देत असते. अलीकडच्या कथानकात प्रेक्षकांनी पाहिले की, दीप्ती (गरिमा परिहार) आणि चिराग (नवीन पंडिता) आपले कुटुंब परिपूर्ण करण्यासाठी स्वरा (वृही कोडवारा)ला दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. जेव्हा पटेल कुटुंबात गोष्टी स्थिरस्थावर होऊ लागल्या आहेत, तेव्हा आणखी एक धक्कादायक वळण येते. दिलीप पटेल (जयेश मोरे) ची हत्या केल्याचा आरोप जुगल (अंशुल त्रिवेदी)च्या माथी येतो.

पटेल कुटुंब दत्तक घेण्याचा विधी पार पाडून एका रेस्टॉरंट मध्ये स्वराचा वाढदिवस साजरा करतात. जेव्हा सर्व जण हा आनंद साजरा करण्यात मग्न असतात, तेव्हा दिलीप पटेल जुगलचा सूड उगवण्याचा कट रचत असतो. दिलीप पटेलचा बदला घेण्यासाठी संतोष (अमित श्रीकांत सिंह) त्या रेस्टॉरंटला आग लावायचे ठरवतो. सर्व जण रेस्टॉरंटच्या बाहेर पडण्याची धडपड करत असतात. शेवटी दिलीप आणि जुगल आत राहतात. राशी जुगलला दिलीपला धक्का मारताना बघते, ज्याच्यामुळे त्याचा मृत्यू होतो. राशी आपल्या वडिलांना आगीत ढकलल्याचा आरोप जुगलवर करते, त्यामुळे पोलीस जुगलला अटक करून तुरुंगात टाकतात.या अडचणीच्या काळात पुष्पाची मेंटर, वकील देवी (उर्वशी धोळकिया) तिच्या मदतीस येते आणि जुगलला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्याची केस लढायला सज्ज होते.

पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “पुष्पाचे जीवन अडचणींनी भरलेले आहे. या आगीच्या प्रसंगामुळे तर ती फारच अगतीक झाली आहे. एकीकडे तिचा दुरावलेला पती त्या आगीत सापडला आहे आणि दुसरीकडे, त्याची हत्या करण्याचा आळ जुगल या तिच्या खास मित्रावर आला आहे. काय करावे हे तिला कळेनासे झाले आहे. पण तरीही, मनातून तिचा विश्वास आहे की, जुगल असे अधम कृत्य करणार नाही. पुष्पाच्या धैर्याची पुन्हा कसोटी होणार आहे. आणि मला खात्री आहे की, पुढे काय होणार ही उत्सुकता प्रेक्षकांना देखील खिळवून ठेवेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…