
no images were found
मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न !
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ च्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट मधील समाजकार्य विभाग मार्फत लायन्स लॅब रुग्णालय मिरज/ रोटरी क्लब हातकनंगले यांच्या सहकार्याने करंजफेण तालुका शाहूवाडी येथेमोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.
नेत्र तपासणी साठी गावातील सुमारे 70 नागरिक उपस्थित होते.लायन्स लॅब नेत्र रुग्णालय मिरज / रोटरी क्लब गडिंग्लज याचे ट्रस्टी डॉ. नंदकुमार सुतार यांनी आलेल्या रुग्णांना ट्रस्ट बद्दल माहिती व समुपदेशन केले. नेत्र तपासल्या नंतर 40 भर रुग्ण मोतीबिंदू झालेले आढळले.रुग्णांना महात्मा फु ले या योजनेतून अल्प खर्चामध्ये ऑपरेशन करण्याची हमी दिली.
या शिबिराचा उपयोग गावातील गरजू लोकांना झाला . गावातील वयस्कर रुग्णांना आहेत त्यांच्या घरी जावून तपासणी करण्यात आली. गावाचे उपसरपंच प्रवीण रावजी पाटील उपस्थित होते. समजकार्याची विद्यार्थिनी कु.हर्षदा पाटील हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर समाजकार्याची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता माने हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. कु.मोनाली साळुंखे हिने सर्वांचे आभार मानले