Home आरोग्य बुडालेल्या जहाजातून तेल गळती सुरू, कोकण किनारपट्टीला मोठा धोका

बुडालेल्या जहाजातून तेल गळती सुरू, कोकण किनारपट्टीला मोठा धोका

0 second read
0
0
299

no images were found

बुडालेल्या जहाजातून तेल गळती सुरू, कोकण किनारपट्टीला मोठा धोका
सिंधुदुर्ग : विजयदुर्गजवळ समुद्रात बुडालेल्या पार्थ या तेलवाहू जहाजातून तेलगळतीला सुरुवात झाली आहे. गोव्यातील समुद्र विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या जहाजातून होणारी तेल गळती अपघाताच्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला पसरणार आहे. त्यामुळे या तेल गळतीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांना बसणार आहे.

किनाऱ्यापासून ४० ते ५० वाव क्षेत्रामध्ये समुद्रात दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ नावाचे जहाज बुडाले आहे. हे तेलवाहू जहाज बुडाल्याने किनारी भागामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या जहाजातून कोणत्याही क्षणी तेल गळती होऊ शकते, असा इशारा देण्यात आला होता. अखेर या जहाजातून तेल गळतीला सुरुवात झाली आहे. १०१ मीटर लांबीचे हे तेल वाहू जहाज आहे. १६ सप्टेंबरला ते अपघातग्रस्त झाले होते. रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले होते.
या जहाजातील तेल गळतीचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. कोकणातील मासेमारी काही प्रमाणात यामुळे धोक्यात येऊ शकते. तर जहाज अपघातग्रस्त झालेल्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला या जहाजातील तेल पसरणार असल्याची माहिती गोवा समुद्री विज्ञान संस्थेने दिली आहे.
तेल गळतीपासून होणारे परिणाम रोखण्यासाठी रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या भागात २५० लिटर ऑइल स्पील डिस्परसंट (OSD) ची फवारणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली आहे. तेल गळतीच्या ठिकाणी पॅण्डी क्लबच्या स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत
दरम्यान, या पार्श्वभूमीवर या तेल गळतीच्या स्थितीचा सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,आदी सहभागी झाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…