no images were found
होळीच्या रंगात रंगलेले सोनी सबचे कलाकार आपल्या चाहत्यांना देत आहेत होळीच्या शुभेच्छा
होळीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसे सोनी सबचे कलाकार हर्षोल्लासाने आणि ऐक्याच्या भावनेने हा रंगांचा सण साजरा करण्यासाठी सज्ज होत आहेत. होळी म्हणजे केवळ एकमेकांना रंग लावणे इतकेच नाही, तर आपले मित्र आणि आप्तस्वकीय यांच्यासोबतचे सलोख्याचे नाते साजरे करण्याचा हा सण आहे. सोनी सबवरील लोकप्रिय कलाकार यंदाच्या होळीसाठी त्यांचे काय प्लॅन आहेत ते सांगत आहेत, ज्यातून या रंगीबेरंगी उत्सवाचे सार दिसून येईल आणि या सणाशी निगडीत रंगीत आठवणी जिवंत होतील.
सोनी सबवरील ‘पश्मीना – धागे मोहब्बत के’ मालिकेत अविनाश शर्माची भूमिका करणारा हितेन तेजवानी म्हणतो, “सर्वांना चमकदार आणि इको-फ्रेंडली होळीच्या शुभेच्छा. हा सण आनंद आणि हास्य यांनी परिपूर्ण असो. पाण्याचा वापर टाळून आणि ऑर्गनिक रंग वापरुन आपण हा उत्सव संस्मरणीय करू या. सुरक्षित रहा आणि आपल्या प्रिय जनांसोबत या सणाचा आनंद लुटा. होळीच्या शुभेच्छा!”
सोनी सबवरील वंशज मालिकेत युक्तीची भूमिका करत असलेली अंजली तत्रारी म्हणते, “आपल्या संस्कृतीत होळीचे विशेष स्थान आहे. हा सण आपल्या आयुष्यात आनंद आणि चमकदार रंग घेऊन येतो. मी दर वर्षी या सणाची खूप आतुरतेने वाट पाहते. माझ्या कुटुंबासमवेत आणि मित्रांसोबत घालवलेले हे क्षण म्हणजे एक सुंदर ठेवा आहे. या प्रसंगाची सकारात्मकता आत्मसात करू या. रंग आणि हास्याने जीवनाचा आनंद साजरा करू या. सर्वांना आनंदमय आणि सुरक्षित होळीच्या शुभेच्छा!”
सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ मालिकेत तन्वी शर्माचे काम करणारी अदिती राठोड म्हणते, “सर्वांना होळीच्या शुभेच्छा! पाणी वाचवून आणि आपल्या पाळीव प्राण्यांचा देखील विचार करून जबाबदारीने हा सण साजरा करू या. मी बऱ्याचदा सेटवरच होळीचा सण साजरा करते. शूटिंगच्या दिवशीच आम्ही रंग खेळतो. सुट्टी असली तर मात्र आसपासच्या रंगीबेरंगी वातावरणात मी रंगून जाते. तुम्हा सर्वांना चमकदार आणि आनंददायक होळीच्या शुभेच्छा!”
सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ मालिकेत आकाश अवस्थीची भूमिका करणारा समर वरमानी म्हणतो, “माझ्या मित्रांसोबत हा रंगांचा सण साजरा करण्यासाठी मी आतुरतेने होळीची वाट बघत आहे. घरी असताना होळी हा संपूर्ण कौटुंबिक सण असायचा. सर्व नातेवाईक एकत्र व्हायचे, पण आता कामाच्या निमित्ताने मुंबईत आल्यानंतर मित्रांसोबत हा सण साजरा होतो. एक अभिनेता म्हणून मला माझा चेहरा सुरक्षित ठेवावा लागतो. त्यामुळे रंगांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी मी साधा उपाय करतो. मला वाटते की ऑर्गनिक रंगांनीच होळी खेळली पाहिजे, केवळ आपल्या सुरक्षेसाठीच नाही, तर पर्यावरणासाठी देखील! तर, निसर्गाला नुकसान न पोहोचवता आपल्या प्रियजनांसोबत हा सण मजेत साजरा करू या. सर्वांना आनंददायक आणि इको-फ्रेंडली होळीच्या शुभेच्छा!”
सोनी सबवरील वंशज मालिकेत धनराज महाजनची भूमिका करत असलेला गिरीश सहदेव म्हणतो, “सर्वांना आनंददायक होळीच्या शुभेच्छा! सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत हा सण मजेत साजरा करावा. एका कवितेच्या रूपात मी माझे मनोगत सांगेन: आया रंगों का त्योहार, लाया उम्मीदों की बौछार. खेलो संग सखी और सखा, पर ना हो कोई तुमसे खफा. ध्यान रहे कोई रूठे ना, ना चोट लगे कोई हड्डी टूटे ना. होळीच्या शुभेच्छा मित्रांनो!”