no images were found
दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील विविध महाविद्यालयातील दूरशिक्षण अभ्यासकेंद्रातील समन्वयक व लेखनिक यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव डॉ.निलेश बनसोडे होते.
पहिल्या सत्रामध्ये उद्घाटक व प्रमुख पाहुणे संगणक विभागाचे प्रभारी संचालक डॉ.अभिजित रेडेकर म्हणाले की, ऑनलाईन शिक्षण ही आजची गरज आहे.सर्व घटकांना सामावून घेण्याचे प्रभावी साधन म्हणून ऑनलाईन शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. त्याचबरोबर विध्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये सातत्याने नवीन बदल होत असून विध्यार्थ्यांना सोयीचे व उपयुक्त असेच ऑनलाईन अर्ज बनविण्यात आलेला आहे.त्या अनुषंगाने डॅशबोर्डची सुविधा ही विकसित केली असून त्यातून अद्यावत माहिती मिळणार आहे. उपकुलसचिव श्री.सी.एस.कोतमिरे, अध्यक्ष डॉ.निलेश बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी ऑनलाईन प्रवेश अर्जाचे प्रात्यक्षिक सादरीकरण संगणक विभागाचे श्री.ए.व्ही.घाटे व संग्राम पाटील यांनी केले. तसेच अभ्यासकेंद्रांनी करावयाच्या कामकाजाचे मार्गदर्शन समन्वयक डॉ.क.बी.पाटील यांनी केले. या कार्यशाळेसाठी ५९ अभ्यासकेंद्रांनी सहभाग घेतला, तसेच केंद्रातील समन्वयक, सहा.प्राध्यापक व प्रशासकिय कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक समन्वयक डॉ.के.बी.पाटील केले,पाहुण्याचा परिचय श्री.दत्तात्रय कमलाकर यांनी करून दिला, सुत्रसंचालन डॉ.परशराम देवळी यांनी केले तर आभार डॉ.नितीन रणदिवे यांनी मानले.