Home शैक्षणिक मुट कोर्टमुळे कायद्याचा सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत – न्यायाधीश शिवाजी साळुंखे

मुट कोर्टमुळे कायद्याचा सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत – न्यायाधीश शिवाजी साळुंखे

4 second read
0
0
23

no images were found

मुट कोर्टमुळे कायद्याचा सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत – न्यायाधीश शिवाजी साळुंखे

कोल्हापूर (प्रतिनिधी) – केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून कोर्टात युक्तिवाद कसा करावा. याचा प्रत्यक्ष अनुभव मुटकोर्टद्वारे विद्यार्थ्यांना मिळतो. यामुळे सक्षम विद्यार्थी तयार होण्यास मोलाची मदत मिळते. सध्याच्या काळात अशा उपक्रमाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश शिवाजी साळुंखे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ विधी विभागाच्या वतीने मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे होते. जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे, जिल्हा न्यायाधीश अपर्णा वाईकर आदींसह उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश शिवाजी साळुंखे म्हणाले कायद्याची पदवी घेतल्यानंतर लवकरात लवकर सक्षम होण्यासाठी मुटकोर्ट स्पर्धा उपक्रमात, सहभाग घेणे अत्यंत
महत्त्वाचे आहे.
त्यानंतर बोलताना जिल्हा न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी विधी पदवीधर व युवा वकिलांनी आयुष्यात यशस्वी वकील व्हायचे असल्यास कायद्याच्या ज्ञानाबारोबरच सभावतालच्या घडामोडी कडे लक्ष ठेवून चौफेर ज्ञान बाळगणे गरजेचे आहे. वकिलांची कर्तव्य न्यायालयीन अधिकार विधी शिक्षणानंतरच्या संधी याबरोबरच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन यशस्वी होण्यासाठी कार्य आणि जबाबदारी याची सविस्तर माहिती सांगितली.
विद्यापीठ विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोर्टात कसा युक्तिवाद करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे महत्त्वाचे असते. यासाठी विधी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले. नववी राष्ट्रीय मुटकोर्ट व वाद विवाद निवारण स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जिल्हा न्यायाधीश श्री. एस. आर. साळुंखे, जिल्हा न्यायाधीश ए. एसत्र वाईकर व इतर न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड, एस. ए. बाफना, के. आर. सिंघेल, पी. आर. राणे, एस. बी. देवरे, पी. एल. गुप्ता, ज्येष्ठविधीज्ञ गिरीश नाईक, माधव आचार्य यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

शिवाजी विद्यापीठासह नऊ महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

या राष्ट्रीय स्तरावरील मुटकोर्ट व वाद विवाद निवारण स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठासह नऊ महाविद्यालयांनी भाग घेतला. सदर स्पर्धेचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे : एल. एल. बी. मुटकोर्ट विजेते : व्ही. एम. साळगांवर कॉलेज ऑफ लॉ पणजी, गोवा. उपविजेते शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर. एल. एल. एम. मुटकोर्ट विजेते : डिपार्टमेंट ऑफ लॉ, शिवाजी विद्यापीठ. उपविजेते : ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा. मेडिएशन रोल प्ले विजेते : शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर. उपविजेते : डिपार्ठमेंट
ऑफ लॉ, शिवाजी विद्यापीठ. बेस्ट रिसर्चर एल. एल. बी. मुटकोर्ट : नेहा एस. पोंबुफेंकर, व्ही, एम, साळगांवकर कॉलेज ऑफ लॉ. गोवा. बेस्ट रिसर्चर एल. एल. एम. मुटकोर्ट : प्रियांका वसंतराव निकम, ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, कोल्हापूर. बेस्ट मूटर एल. एल. बी. मुटकोर्ट माहेश्वरी डी. गुंडेवाडी, शहाजी लॉ, कॉलेज, कोल्हापूर. बेस्ट मेडिएटर : साईष्णू सुयोग पंडित, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ.

विधी अधिविभाग प्रमुख डॉ. वि. व्हाय. धुपदाळे यांनी लिहिलेले पुस्तकाचे प्रकाशन : राष्ट्रीय मुटकोर्ट स्पर्धेच्या निरोप समारंभाचे अवचित साधून डॉ. वि. व्हाय. धुपदाळे प्र. विभाग प्रमुख यांनी आपल्या “Indian Constitutional Law : The New Challenges” या पुस्तकाचे अनावरण प्रमुख पाहूणे जिल्हा न्यायाधिश एस. आर. साळंुखे व श्रीमती. ए. एस. वाईकर व मान्यवर न्यायाधीशांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाचे संयोजन आर. नारायण यांनी केले. आभार डॉ. विवेक धुपदाळे यांनी मानले. यावेळभ् ॲड. प्रमोद दाभाडे, कपाले, रोहिदास भांगरे, गौरव जवळकर महेंद्र चव्हाण कार्तिक कुलकर्णी, देवदास चौगुले जयदीप कदम, नागेश दरेकर आश्विनी पाटील यासह विधी विभागातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …