Home शासकीय अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

16 second read
0
0
101

no images were found

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

            अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधीनागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्तनाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हातालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिरसा मुंडा यांचे बलिदान  स्वाभिमानाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बिरसा मुंडा यांचे बलिदान  स्वाभिमानाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणव…