no images were found
सहाय्यक कामगार आयुक्त यांचेकडे 8 पथविक्रेत्यांची निवडणूक घेणेकरिता प्रस्ताव सादर
कोल्हापूर : पथविक्रेता कायदा 2014 व 09 जानेवारी 2017 चे पथविक्रेता उपजिवीका संरक्षण व पथविक्रेते विनियम 2017 अंमलबजावणी महापालिकेच्यावतीने सुरु आहे. या समितीमध्ये 20 सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. शहर पथविक्रेता समितीमध्ये 20 सदस्यांची रचना असून या समितीचे अध्यक्ष आयुक्त आहेत. या समितीमध्ये शासकीय समिती सदस्य 5 असून इतर मंडळाचे सदस्य 4, व्यापारी प्रतिनिधी 1, पणन संघाचे प्रतिनिधी 1 व अग्रणी बँकेचा प्रतिनिधी 1 असे 7 प्रतिनिधी यांची निवड शासन निर्देशानुसार करण्यात आली आहे. उर्वरीत 8 प्रतिनिधी पथविक्रेता यांचेमधून निवडणूक घेऊन समितीवर घेतले जाणार आहेत.
शासकीय समितीच्या मान्यतेने शहरातील सर्व पथविक्रेत्यांचे मोबाईल ॲपद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले असून या सर्व्हेक्षण यादीस सूचना हरकती घेऊन ती अंतिम करण्यात आली आहे. या अंतिम पात्र पथविक्रेता यादीमध्ये 5630 पथविक्रेत्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. ही यादी दि.12 मार्च 2024 रोजी सहा. कामगार आयुक्त यांचेकडे निवडणूक घेण्याकरिता पाठविण्यात आले असून पथविक्रेत्यांची निवडणूक घेऊन 8 प्रतिनिधींची शहर पथविक्रेता समितीवर निवड होणार आहे. या निवडीनंतर शहर पथविक्रेता समितीमध्ये 20 सदस्यांची समिती अंतिम होणार आहे. या शहर पथविक्रेता समितीचे मान्यतेने पथविक्रेता शुल्क निश्चित करणे, शहरातील पथविक्रेता झोन व ना-पथविक्रेता झोन प्रक्रिया झोन राबविण्यात येणार आहे.