Home सामाजिक आयसीआयसीआय  प्रुडेन्शियल लाइफमध्ये ‘क्लेम फॉर शुअर’ सेवा

आयसीआयसीआय  प्रुडेन्शियल लाइफमध्ये ‘क्लेम फॉर शुअर’ सेवा

2 min read
0
0
68

no images were found

आयसीआयसीआय  प्रुडेन्शियल लाइफमध्ये क्लेम फॉर शुअर’ सेवा

 

मुंबई – जीवन विमा हा आर्थिक नियोजनाचा एक आवश्यक घटक आहे, जो कुटुंबाला तसेच कर्त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. पॉलिसीधारकाचे अकाली निधन झाल्यास कुटुंबाची आर्थिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी कंपनीने दिलेले हे वचन आहे.

उल्लेखनीय म्हणजे, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सकडे सातत्यपूर्ण क्लेम सेटलमेंट रेशोचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, यात आर्थिक वर्ष 2024 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यांसाठी क्लेम सेटलमेंट रेशो 98.6% आहे.क्लेम सेटलमेंट रेशोमध्ये सातत्य महत्त्वाचे आहे. कारण आपण नसताना आपल्या कुटुंबाची आर्थिक कारणांमुळे हेळसांड होणार नाही, याचा विश्वास ते पॉलिसीधारकाला देतात.आयसीआयसीआय  प्रुडेन्शियल लाइफचा क्यू1- आर्थिक वर्ष 2024 मध्ये क्लेम सेटलमेंट रेशो 98.10%, क्यू2- आर्थिक वर्ष 2024 98.14% आणि क्यू3- आर्थिक वर्ष 2024 मध्ये हे प्रमाण 98.52% होते. विशेष म्हणजे, सर्व संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर तपास न केलेल्या दाव्यांसाठी सरासरी सेटलमेंट टर्नअराउंड वेळ हा केवळ 1.3 दिवस होता. ही आकडेवारी डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांसाठीची आहे.

आयसीआयसीआय  प्रुडेन्शियल लाइफमध्ये एक क्लेम फॉर शुअर सेवा देखील आहे. यात सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर एका दिवसात सर्व पात्र मृत्यू दावे निकाली काढले जातात. या उपक्रमांतर्गत दाव्यावर प्रक्रिया करण्यास विलंब झाल्यास, आयसीआयसीआय  प्रुडेन्शियल लाइफ लाभार्थ्याला दाव्याच्या रकमेवर जमा झालेल्या व्याजासह भरपाई देते. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …