Home सामाजिक म्हणून मुली लग्न करायला तयार होत नाही, सर्वेक्षणमधून मोठा खुलासा

म्हणून मुली लग्न करायला तयार होत नाही, सर्वेक्षणमधून मोठा खुलासा

0 second read
0
0
73

no images were found

म्हणून मुली लग्न करायला तयार होत नाही, सर्वेक्षणमधून मोठा खुलासा

सध्या परिस्थिती अशी आहे की, मुलगा किंवा मुलगी लग्नाचे वय झाले तरी देखील लग्नाला तयार होत नाही. यामुळे अनेक कुटुंबे अशी आहेत ज्यांचे पालक नाराज आहेत. त्यांना त्यांच्या मुलांचे भविष्य कसं जाईल, त्यांचे आयुष्य कसे जाईल या विचारात असतात. तर अनेक पालक इमोशनल ब्लॅकमेलही करतात.
तर दुसरीकडे लग्नाबाबत तरुणांचे विचार बदलत चालले आहेत. जसे की, काहीजण एकट राहणे पसंत करतो. त्यांना असे वाटते की लग्न हे त्यांच्या करिअरमध्यो अडथळा ठरू शकतात. ज्यामुळे ते एकतर उशिरा तरी लग्न करतात किंवा लग्न करतच नाही. अशातच एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये मुलींना लग्न का करायचं नाही, त्याचे कारण समोर आले आहे.
दरम्यान, नुकतेच एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. हा अभ्यास डेटा विश्लेषक ‘मिंटेल’ने केला आहे. या सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की 49% पुरुष अविवाहित असूनही आनंदी आहेत. आणि 61% महिला एकट्या राहतात. सर्वेक्षणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 75% अविवाहित मुलींनी जोडीदाराचा शोधही घेतला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तर मुलींच्या तुलनेत 65% मुले अशी आहेत ज्यांनी लग्नाचा विचारही केला नाही.
असे म्हणतात की, लग्नानंतर पवित्र नाते जपण्याची जबाबदारी मुलांपेक्षा मुलींवर अधिक असते असं अभ्यासात म्हटले आहे. नातेसंबंध जपण्यासोबतच त्यांना घरची कामे करावी लागतात जसे की स्वयंपाक करणे, कुटुंबाची काळजी घेणे, कौटुंबिक संस्कार चांगले ठेवणे इत्यादी. लग्नानंतर त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. याशिवाय त्यांना जीवनात काही साध्य करायचे असले तरी त्यांना त्यांच्या कामासोबतच घर सांभाळणेही कठीण जाते. म्हणूनच लग्नात करण्याचा नकार देतात.
दुसरीकडे, पुरुषप्रधान देशात मुलींची घुसखोरी होत असल्याचा दावा केला जात आहे. ते त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत असून त्यांच्या इच्छेनुसार जगता आहेत. लोक काय म्हणतील? हा विचार बाजूला ठेवून आजकालच्या मुली स्वतंत्र आयुष्य जगत आहेत . त्यामुळे पूर्वीपेक्षा अविवाहित मुलींची संख्या वाढत आहे. तसेच मुलींना एकटे राहण्यात कोणतीही अडचण येत नाही. मुलींचा असा विश्वास आहे की, पत्नी आणि आई बनल्याने त्यांना आनंग मिळेल याची शाश्वती नसते. त्यांना एकटे राहून आनंद मिळतो आणि त्यात गैर ते काय? ते स्वावलंबी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना जोडीदाराची गरज भासत नाही, असा खुलासा रिपोर्टमधून करण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …