no images were found
दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहान देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना
कोल्हापूर : जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहान देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना कार्यान्वीत आहे. किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास या योजनेअतंर्गत पात्र लाभार्थ्यास 50 हजार रुपये अर्थ सहाय्य दिले जाते. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र अपंग, अव्यंग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
अर्थसहाय्य याप्रमाणे २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, 20 हजार रुपये रोख स्वरुपात, 4 हजार 500 रुपये संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदी साठी व 500 रुपये स्वागत समारंभ कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे-
वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असावे. (जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र ) अपंग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत या पूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.