Home शासकीय नगररचना विभागाकडून शिबीरात 1000 चौ.मी. वरील 55 प्रकरणे मंजूर

नगररचना विभागाकडून शिबीरात 1000 चौ.मी. वरील 55 प्रकरणे मंजूर

6 second read
0
0
20

no images were found

नगररचना विभागाकडून शिबीरात 1000 चौ.मी. वरील 55 प्रकरणे मंजूर

कोल्हापूर  : महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या विकास परवानगी प्रकरणांच्या मंजूरीकामी गुरुवारी एक दिवसाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 1000 चौ.मी. भूखंड क्षेत्रापर्यंतची विकास प्रकरणे घेतली आहेत. यामध्ये 55 प्रकरणे मंजूर करण्यात आली. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सुचनेनुसार हे शिबीर गुरुवारी घेण्यात आले. यामध्ये 15 बांधकाम प्रकरणे मंजूरी, 23 बांधकाम परवाना, 10 भोगवटा प्रमाणपत्र, 5 गुंठेवारी प्रकरण, 2 एकत्रिकरण विभाजन अशी 55 प्रकरणे मंजूर करण्यात आली.

या शिबीरामध्ये उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंता यांनी नागरीकांची कामे तपासून सादर केली. या कॅम्पला नागरिक व वास्तूशिल्पी यांचेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …