no images were found
रोजगार वाढीसह व्यवसायनिहाय क्लस्टर उभारून उद्योगाला चालना देऊया – अमोल येडगे
कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनातून सुरु झालेल्या उद्योगातून रोजगार वाढवून प्रत्येक उत्पादनाचे क्लस्टर उभारून उद्योग वाढीसाठी चालना देऊया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त शासन आपल्या दारी धर्तीवर ‘लिडकॉम आपल्या दारी’ हा कार्यक्रम महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अग्रणी बॅकेचे प्रंबधक गणेश गोडसे, समाज कल्याण अधिकारी सचिन पाटील, प्रकल्प अधिकारी वनिता पाटील, माजी उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, अखिल महाराष्ट्र चर्मकार सेवा संघाचे राज्य अध्यक्ष रघुनाथराव मोरे व जिल्हा अध्यक्ष विठ्ठल नांगरे महाराज, राष्ट्रीय चर्मकार संघाच्या सरोज बिसुरे आणि राष्ट्रीय चर्मकार महांसघाचे जिल्हा अध्यक्ष सुखदेव सातपुते, सावर्डेचे संरपच भगवान रोटे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते दामाजी रोटे, रमेश टोणपे, सुनिल शिंदे, रामभाऊ कोरे, परसु सातपुते, कृष्णात चौगुले, महेश पांडव, संतोष बिसुरे, दिपक यादव, वसंत पोवार, मनिषा डोर्इफोडे व रंजनी शिंदे, जिल्हा परिषदचे सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी चव्हाण, पत्रकार युवराज मोरे व दगडू माने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाव्यवस्थापक एन.एम.पवार यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबाची रोपे वाटून स्वागत केले व प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महामंडळाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा कार्यालयासाठी सर्व योजनेचे 307 लाभार्थ्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 308 उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल कार्यालयीन कामकाजाचे कौतुक केले. उपस्थितांना महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन केले. गणेश गोडसे यांनी जास्तीत जास्त बॅंकेची कर्ज प्रकरणे करण्याचे आवाहन केले.श्री. शेटे यांनी महामंडळाचे कर्ज प्रकरणे करताना येणा-या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जाचक अटी शिथिल करण्याबाबत विनंती केली व दुर्वास बापू कदम यांनी दोन लाखापर्यत कर्जास एक जामिनदार घेतल्याबद्दल व अनुदानाची रक्कम दहा हजारवरुन पन्नास हजार केल्याबद्दल महामंडळाचे आभार व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मोरे यांनी कोल्हापूर जिल्हा कार्यालयातील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यानंतर नवउद्योजक ओमप्रकाश कांबळे यांनी महामंडळाकडून कर्ज घेऊन कसा फायदा घेतला व यशस्वी उद्योजक कसे बनलो याबद्दल सर्वांसमोर कथन केले.जिल्हा व्यवस्थापक श्री. पवार यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती सांगितली व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळ कशा प्रकारे वाटचाल करत आहे त्याबाबत सविस्तर माहिती दिली. नवीन उद्योजक घडविण्यासाठी 25 हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत एमसीडीर्इ मार्फत प्रशिक्षण सुरु असल्याचे सांगितले. एकरक्कमी कर्ज भरणा करणा-या लाभार्थ्यांना व्याजात सुट इत्यादी बद्दल माहिती दिली. अधिकाअधिक लाभार्थ्यांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच उपस्थित सर्व समाज बांधवाचे, अधिकार-यांचे, पदधिका-यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.