
no images were found
न्यू पॉलिटेक्निक ग्रंथालयास ‘डेलनेट’ कडून प्रशंसापत्र
देशभरातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे दालन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने उघडून देण्यात अग्रेसर ठरल्याने नवी दिल्लीतील ‘डेलनेट’ या ऑनलाईन लायब्ररीकडून न्यू पॉलिटेक्निकने प्रशस्तीपत्र पटकावत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे म्हणाले की ‘डेलनेट’ या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांच्या संदर्भ ग्रंथांच्या वाढत्या गरजा पूर्ण होत आहेत. ग्रंथालयास प्रत्यक्ष भेट न देताही त्यांना आवश्यक शैक्षणिक साधन सामग्री उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे पाऊल उचलले आहे. विज्ञान, अभियांत्रिकी, मानव्यविद्या अशा शाखांतील विविध विषयांची सामग्री इथे उपलब्ध आहे. संस्थेने नोंदणी केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांचाही त्यांना लाभ मिळू शकेल.
ग्रंथालय बळकट व अद्ययावत करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
शैक्षणिक क्षेत्रात संशोधन व नवीनता यांचे महत्त्व अधोरेखित करताना ग्रंथपाल श्री. अनंत गिरीगोसावी म्हणाले की वापरकर्त्यांना विविध नियतकालिकांच्या माहितीस्त्रोतांमध्ये थेट प्रवेश मिळत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पारखलेली मान्यताप्राप्त अनेक नियतकालिके, लेख आणि जवळपास ३४५९६ पेक्षा जास्त ई-पुस्तके विद्यार्थी व शिक्षक शोधून ते प्राप्त करू शकतात.
या कामात संगणक तज्ञ प्रा. आशिष थोरात, संगणक प्रणाली व्यवस्थापक केतन हिरेमठ व प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे यांचे सहकार्य लाभले.