no images were found
‘गाथा नवनाथांची’ मालिकेत अनुभवता येणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा
कोल्हापूर : सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी ‘गाथा नवनाथांची’ ही पौराणिक मालिका लवकरच ९०० भागांचा टप्पा पार करणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचां अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला दाखवण्यात आल्या आहेत. सध्या नागनाथांचा प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेत. तर मालिकेच्या आगामी भागात कोल्हापुरातील करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव सोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात जेव्हा किरणोत्सव सोहळा पार पडला, त्याकाळात श्री गुरूदेव दत्त हे कोल्हापुरात नागनाथांना भीक्षेचे महत्व समजावून सांगताना भीक्षा मागत असल्याचा एक पौराणिक संदर्भ आहे. त्यानुसार मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षक, भक्तांना श्री गुरूदेव दत्त आणि नावनाथांची कथा उलगाडताना कोल्हापुराच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा देखील अनुभवता येणार आहे. नवनाथांच्या जोडीला आदिशक्ती महालक्ष्मीचे हे तेजोमय व विलोभनीय रूप नक्कीच प्रेक्षक भक्तांसाठी पर्वणी ठरेल.
आतापर्यंत आपण ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत गुरू आई पाटील यांचे कारस्थान, नागिनीचा दंश झाल्यानंतर नागनाथांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून आईचे वाचवलेले प्राण आणि नागनाथांच्या हातून होत असलेला गुरू आईचा संहार हे पाहिले आहेस . तर पुढील भागात काय पाहायला मिळणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सध्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्याकडे नागनाथांचे नाथ सांप्रदयातील शिक्षण सुरू आहे. या दरम्यान नागनाथांना श्री गुरूदेव दत्त आणि इतर नाथांकडून शिक्षण देताना भीक्षेचे महत्व समजावून सांगितले जाणार आहे.