no images were found
नेक्स्ट्रा आपल्या डेटा सेंटरसाठी खरेदी करणार 140,208 मेगावॅट अक्षय ऊर्जा
गुरुग्राम (भारत) : भारतातील आघाडीच्या डेटा सेंटर कंपन्यांपैकी एक असलेल्या नेक्स्ट्रा बाय एअरटेल ने आज अतिरिक्त 140,208 मेगावॅट अक्षय ऊर्जा खरेदी करण्यासाठी एम्पीन आणि एम्पलस एनर्जी सोबत पॉवर-व्हीलिंग कराराची घोषणा केली. यासह, नेक्स्ट्राने आता लक्ष्य ठेवले आहे की ते दरवर्षी 99,547 कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या बरोबरीचे कार्बन फूटप्रिंट कमी करेल.करारानुसार, एम्पिन एनर्जी आणि एम्पलस एनर्जी तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि ओडिशामधील नेक्स्ट्राच्या डेटा सेंटरसाठी अनुक्रमे 48 मेगावॅट डीसी आणि 24.3 मेगावॅट क्षमतेचे कॅप्टिव्ह सोलर आणि पवन ऊर्जा प्रकल्प स्थापित करणार आहेत. नेक्स्ट्रा ही भारतातील ग्रीन डेटा सेंटरची सर्वात मोठी शृंखला आहे. या 25 वर्षांच्या करारामुळे, नेक्स्ट्राचे 2031 पर्यंत सर्व डेटा सेंटर्स कार्बन शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. हे पाऊल नेक्स्ट्राला पर्यावरणपूरक डेटा सोल्यूशन्समध्ये अग्रणी म्हणून स्थापित करते.हे नेक्स्ट्राच्या आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 100% प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या अनेक प्रयत्नांच्या व्यतिरिक्त आहे. या प्रयत्नांमध्ये, नेक्स्ट्राने तिच्या सर्व ऑपरेशन्समध्ये हरित ऊर्जेचा अवलंब करण्यास गती दिली आहे. उर्जेचे संरक्षण करण्यासाठी, कंपनीने तिच्या पायाभूत सुविधा आणि प्रक्रियांमध्ये बदल केले आहेत. शिवाय, त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी शाश्वत व्यवसाय पद्धतींचा अवलंब केला आहे.
आशिष अरोरा, सीईओ – नेक्स्ट्रा बाय एअरटेल, म्हणाले, या नवीन भागीदारी भारताच्या ग्रीन डेटा सेंटर क्षेत्रात अग्रेसर राहण्याची आणि 2031 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची आमची वचनबद्धता दर्शवितात. अतिरिक्त स्वच्छ ऊर्जा पुरवठ्यामुळे आता आमच्या डेटा सेंटरला आणखी स्वच्छ ऊर्जा मिळेल. यासह, डेटा सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या 70 टक्के ऊर्जा अक्षय ऊर्जा स्त्रोतांकडून येईल. भविष्याकडे पाहता, आम्ही आमची क्षमता वाढवण्यासाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नव्या युगासाठी सज्ज राहण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न करत आहोत. आम्हाला पर्यावरणाप्रती असलेल्या आमच्या जबाबदारीचीही पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही हवामानावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.