
no images were found
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात गट-ड पदांसाठी १९ मे रोजी ऑनलाईन परीक्षा
कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदांकरीता दि. 19 मे 2025 रोजी परीक्षा होणार आहे. सर्व उमेदवारांनी परिक्षेसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, कोणत्याही अमिषास बळी पडू नये तसेच कोणाशीही कुठल्याही प्रकारचे अर्थिक व्यवहार करु नयेत, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांनी केले आहे.
परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. ही पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस., या कंपनीमार्फत करण्यात येणार असून ऑनलाईन परिक्षा दि. 19 मे 2025 रोजी ही एकूण दोन सत्रामध्ये होत आहे. परिक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी www.rcsmgmc.ac.in व https://kolhapur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा केंद्रावर संबंधीत उमेदवाराला प्रवेश देण्यात येईल.
परिक्षेसंदर्भातील सर्व सुचना संस्थेच्या www.rcsmgmc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येतील संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच अधिकृत असेल यांची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहिती करीता अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर यांच्या कार्यालयामधील दूरध्वनी क्र. ०२३१२६४१५८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही डॉ. मोरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.