Home शैक्षणिक एरोजेल संशोधन काळाची गरज : डॉ. व्ही. जी. पारळे

एरोजेल संशोधन काळाची गरज : डॉ. व्ही. जी. पारळे

0 second read
0
0
29

no images were found

एरोजेल संशोधन काळाची गरज : डॉ. व्ही. जी. पारळे

 
कोल्हापूर (प्रतिनिधी): एरोजेल पदार्थांचे संशोधन आपले जीवन अधिक सुखकर करेल असे प्रतिपादन प्रा डॉ. व्ही. जी. पारळे, संशोधक प्राध्यापक, योन्साय विद्यापीठ, सेउल, दक्षिण कोरिया यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आयोजित “एरोजेल मधील नवीन संशोधन” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व डॉ. व्ही. जी. पारळे यांचा परिचय अधिविभागप्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी करून दिला. तसेच त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार ही करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. पारळे यांनी त्यांची संशोधनातील वाटचाल सांगून व्याख्यानाची सुरवात केली. त्यांनी एरोजेल पदार्थाचा रंजक इतिहास, त्यांचा उपयोग यांविषयी माहिती दिली. भारतामध्ये डॉ. ए. व्ही. राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र अधिविभागामध्ये एरोजेल संशोधनाची सुरवात झाल्याचे त्यांनी नमूद केले. एरोजेल पदार्थ तयार कोणकोणत्या पद्धतीने तयार केला जातो, त्यामध्ये कोणत्या अडचणी व संधी आहेत याविषयी माहिती दिली. एरोजेल व त्यांचे प्रकार, त्यामधील विज्ञान यांविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. एरोजेल पदार्थ हे मुख्यत: अग्निरोधक म्हणून उपयुक्त आहेत. तसेच त्याच्या रचनेमध्ये बदल केल्यानंतर एरोजेल पदार्थांचे गुणधर्म बदलतात त्याचा उपयोग विविध क्षेत्रात केला जाऊ शकतो. ते पुढे म्हणाले की भविष्यात एरोजेल पदार्थ हा प्लास्टिक सारखा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होईल. त्यांनतर प्रश्नोत्तरे चर्चा झाली त्यामध्ये उत्स्फूर्तपणे अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रा. डॉ. के. वाय. राजपुरे यांनी व्याख्यान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून आभार मानले. तसेच त्यांनी एरोजेल संशोधनात भौतिकशास्त्र अधिविभागाच्या योगादानादाबद्दल माहिती दिली. त्यामध्ये भाभा अणुविज्ञान केंद्रासाठी लागणारे एरोजेल पदार्थ भौतिकशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. वाघ, डॉ. हरनाथ यांनी डॉ. राव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्याचे सांगितले. नेहा व साधना या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे कुशलतेने सूत्रसंचालन केले. याप्रसंगी, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. यु. एम. चौगुले, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एस. एस. पाटील, यांच्यासह अधिविभागातील विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले. विभागप्रमुख झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी विविध व्याख्याने आयोजित केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे आभार मानले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली

प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय व आयसोलेशन रुग्णालयाय भेट दिली &nbs…