no images were found
महिला लोकशाही दिन सोमवारी
कोल्हापूर : माहे जानेवारी 2024 चा महिला लोकशाही दिन महिन्यातील तिसरा सोमवार दि. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी.बी.शिर्के यांनी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिन तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी, जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिस- या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिनास पिडीत महिलांनी
त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. शिर्के यांनी केले आहे.