Home शासकीय दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत –  देवेंद्र फडणवीस

दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत –  देवेंद्र फडणवीस

50 second read
0
0
19

no images were found

दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत –  देवेंद्र फडणवीस

 

 

            मुंबई  : बालकांचे हितविकास व कल्याण करण्याच्या हेतूने दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटी कार्यरत आहे. बालकांचे हित व विकासासाठी कार्यरत असणाऱ्या या सोसायटीच्या कर्मचाऱ्यांकरिता संस्थेच्या घटनेप्रमाणे मुंबई नागरी सेवा नियम 1959 मंजूर आहे. मात्र हे नियम 64 वर्षापूर्वीचे असून कालबाह्य आहेत. त्यामुळे सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्याची कार्यवाही करून प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री  तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे दि. चिल्ड्रेन्स एड् सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेविभागाचे सचिव अनुपकुमार यादवमुंबई शहर पोलीस आयुक्त लखमी गौतममहिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे,  दि चिल्ड्रेन्स एड् सोसायटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा नियामक परिषदेचे सदस्य मिलींद तुळसकरजिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे आदी उपस्थित होते.  

            सोसायटीच्या मानखुर्द येथील जागेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विकास आराखडा तयार करण्याबाबत सूचना करण्यात आली होतीत्यांनी आराखडा केलेला असल्यास या विकास आराखड्याची अंमलबजावणी करावीअसे सूचीत करीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमानखुर्द येथे सोसायटी संचलीत मंदबुद्धी बालगृह आहे. या बालगृहाचे नाव दिव्यांग मुलांचे विशेष बालगृहतसेच डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम दिव्यांग मुलांचे बालगृह करण्याची कार्यवाही करावी. 

            सोसायटीचे पेट्रनआजीव सभासद असून यामधील काही सदस्य मृत्यू पावले आहेत. तसेच बऱ्याच सभासदांचे पत्ते मिळून येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत धर्मादाय कायद्यानुसार सर्व बाबी तपासून अशा सभासदांची नावे कमी करण्याबाबत व सोसायटीचा सर्व अभिलेख अद्ययावत करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अशा सभासदांबाबत प्रसिद्धी देवून नंतरच त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही करावीअसेही निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. बोर्ला येथील सोसायटीच्या जमिनीवर उच्च न्यायालयाच्या परवानगीने विभागाने योजना तयार करावी. या योजनेच्या माध्यमातून विकास साधावाअसे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बोर्ला येथील जमिनीच्या सद्यस्थितीबाबत अवगत केले. विभागाने अतिक्रमण थांबविण्यासाठी तातडीने कार्यवाही करून सोसायटीच्या जमिनीवर महिला व बालविकास विभागाचे सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने विकास करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.बैठकीत सचिव अनुपकुमार यादवआयुक्त श्री. नारनवरे यांनी माहिती दिली. संबंधित विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…