
no images were found
राज्यातील एसएमई ना अर्थसहाय्य करता यावे यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार
राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आयपीओ चा वापर करून निधी कसा उभा करावा या बाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक सामंजस्य करार केला आहे. एनएसई हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्स्चेंज आहे. आणि यासाठी एनएसई इमर्ज याचा वापर करण्यात आला. हे एनएसई चे एसएमई (लघु, मध्यम उद्योग) व्यासपीठ आहे.
राज्याचे उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत यांच्या उपस्थितीत, श्री दीपेंद्र सिंह कुशवाह, विकास आयुक्त, उद्योग, महाराष्ट्र सरकार आणि श्री जयेश ताओरी, सहयोगी उपाध्यक्ष, राष्ट्रीय शेअर बाजार, यांच्यात आज पुणे येथे सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. करारानुसार, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने निधी उभारणीसाठी राज्यभरातील कॉर्पोरेट्सना मार्गदर्शन करण्यासाठी एनएसई सेमिनार, एमएसएमई शिबिरे, ज्ञान सत्र, रोड शो, कार्यशाळा याद्वारे जनजागृती मोहीम राबवेल. हे मार्गदर्शन एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्म आणि सूची प्रक्रियेत असलेल्या हँडहोल्ड कंपन्यांच्या साहाय्याने अर्थसहाय्य मिळवण्यासाठी असेल.
महाराष्ट्र सरकारचे माननीय उद्योगमंत्री, श्री. उदय सामंत म्हणाले“महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या राज्यातील एमएसएमईंना, त्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देत आहोत. एमएसएमईएस अधिक सक्षम करण्यासाठी तसेच एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्म द्वारे भांडवली बाजार टॅप करण्यासाठी आणि राज्य एमएसएमईएस ला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंज सोबत सामंजस्य करार केला आहे. एनएसई इमर्ज हे या छोट्या उद्योगांना गुंतवणुकीचा एक पर्याय निर्माण करून देते. विश्वासार्हता मिळवण्याबरोबरच सार्वजनिक भांडवलाचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, स्टॉक एक्स्चेंजवर सूचीकरणाची प्रक्रिया, फायदे आणि बारकावे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही एमएसएमईएस मधील जागरूकता मोहिमा संयुक्तपणे राबवू.”
श्री. श्रीराम कृष्णन, मुख्य व्यवसाय विकास अधिकारी, एनएसई म्हणाले: “आज महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी एमएसएमईच्या वाढीस सहकार्य आणि समर्थन देण्यासाठी एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मद्वारे सामंजस्य करार केला आहे. एनएसई इमर्ज एसएमई ला कार्यक्षम रीतीने भांडवल उभारण्यास आणि स्टॉक एक्स्चेंजवरील सूचीवर त्यांची उपस्थिती दाखवण्यास सक्षम करते. आम्ही सरकारच्या सहकार्याने राज्यातील एमएसएमईसाठी जागरुकता सत्र आयोजित करू आणि निधी उभारणीच्या प्रक्रियेची माहिती देऊ. आम्ही राज्यातील एमएसएमईंना पुढे येण्याचे आवाहन करतो आणि त्यांनी एनएसई इमर्जद्वारे वित्तपुरवठ्याच्या नवीन स्त्रोताचा लाभ घ्यावा.”
आज घडीला, विविध क्षेत्रातील ४२४ कंपन्या एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध आहेत आणि त्यांनी एकत्रितपणे INR 8,836 कोटी उभारले आहेत. या कंपन्यांच्या बाजार भांडवलाने अलीकडेच INR 1,00,000 Cr चा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.