no images were found
गोव्यात सगळे महाग, त्यामुळे पर्यटक विदेशात !
राज्यात यंदाच्या पर्यटन हंगामात कमी प्रमाणात पर्यटक आलेे आहेत. गोव्यात सगळेच महाग आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. पर्यटक आता विदेशात कमी पैशांत जाणे पसंत करत आहेत.
हॉटेल, पर्यटनाशी संबंधित आणि विमानसेवा या सर्वांना मी तुमच्या दरवाढीचा पर्यटनावर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिलेेले आहे. शेजारच्या सिंधुदुर्गमध्येही पर्यटन नावारूपाला येत असून भविष्यात ते गोव्याशी स्पर्धा करू शकतात, असे वक्तव्य वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. मोपा विमानतळावर ‘ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी काउंटर’चे उदघाटन केल्यानंतर माविन बोलत होते.
यावेळी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, चांदेल-हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, तांबोसे, मोपा-उगवेचे सरपंच सुबोध महाले, कासारवर्णेच्या सरपंच अवनी गाड, पेडणेच्या उपनगराध्यक्ष अश्विनी पालयेकर, उपस्थित होते.दरम्यान, आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, हा टॅक्सी काऊंटर होण्यासाठी जरा वेळ लागला. आमदार या नात्याने मी नेहमीच लोकांसोबत असेन. भास्कर नारुलकर म्हणाले की, या काऊंटरच्या मागणीसाठी आंदोलन काळात ग्रीन फिल्ड टॅक्सी असोसिएशन, मोपा विमानतळ लोकल टॅक्सी असोसिएशन आदींचा मोठा पाठिंबा मिळाला.