Home सामाजिक पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी योजना – गिरीश महाजन

पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी योजना – गिरीश महाजन

26 second read
0
0
80

no images were found

पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी योजना – गिरीश महाजन

 

        मुंबई : पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढवा, पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी, पर्यटन विभागाने “आई” हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी  नवी  कर्ज योजना सुरू केली आहे याचा लाभ पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकानी घ्यावा असे आवाहन पर्यटन मंत्री  गिरीश महाजन यांनी केले आहे.

        कर्ज योजना निवडीसाठी निकष आहेत. महिला जो पर्यटन व्यवसाय करतात तो व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा. पर्यटन व्यवसायामध्ये  ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या आणि त्यांनी चालविलेल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसायाकरिता मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याज परतावा देण्यात येईल.या योजनेसाठी व्याजाची रक्कम १२% च्या मर्यादेत त्यांच्या खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधी पर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४.५ लाख रुपयांच्या मयदिपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून देण्यात येईल,

        राज्यातील महिला पर्यटक  उदोजिकानी  अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर अथवा  मुख्यालय: ०२२६९१०७६०० क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. कोकण साठी ९१ ९६०४३ २८०००, पुणे साठी ९१ ९४२३७ ७५५०४ नाशिक साठी ९१ ९६८९९०८१११ , छत्रपती संभाजी नगर साठी ९१ ८९९९० ९७२५५, नागपूर आणि अमरावती साठी ९१ ८४२२८ २२०५८ / +९१ ९२२६७७९७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पर्यटन संचालनालय, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार कसबा बावडा (प्रतिनिधी):- येथील…