Home मनोरंजन  ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी दिसणार नव्या रुपात

 ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी दिसणार नव्या रुपात

4 second read
0
0
36

no images were found

 मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी दिसणार नव्या रुपात

 

 

स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सार्थक आनंदीवर जीवापाड प्रेम करतो. आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो. सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना होते. घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते.

सार्थकने जरी आनंदीला पत्नीचे हक्क दिले असले तरी राजाध्यक्ष कुटुंबाने मात्र तिला मनापासून स्वीकारलेलं नाही. सार्थकच्या आग्रहाखातर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी देण्याचं ठरवलं आहे. आनंदीने देखिल हे आव्हान स्वीकारलं असून पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी गृहप्रवेश करणार आहे. स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे. नव्या रुपात आणि नव्या आत्मविश्वासाने तिने स्वत:ला सिद्ध करायचं ठरवलं आहे. सार्थकच्या साथीने आनंदी हे नवं आव्हान कसं पूर्ण करणार हे मालिकेच्या पुढील भागांधून पाहायला मिळेल. त्यासाठी पाहायला विसरु नका .

Load More Related Articles

Check Also

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी   कोल्हापूर, : जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 5…