Home मनोरंजन ‘वागले की दुनिया’ने पूर्ण केली 3 वर्षे

‘वागले की दुनिया’ने पूर्ण केली 3 वर्षे

14 second read
0
0
42

no images were found

वागले की दुनियाने पूर्ण केली वर्षे

आशयगर्भ आणि जवळीक साधणाऱ्या कथांप्रती आपल्या बांधिलकीसाठी ओळखल्या जाणारी सोनी सब वाहिनी दर्जेदार मजकूर तथा मनोरंजनासाठी पसंतीचे स्थळ ठरली आहेवाहिनीवरील एकापेक्षा एक सरस मालिकांपैकी वागले की दुनिया  नई पिढी नये रिश्ते ही मालिका मुंबईच्या रसरशीत जीवनाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली आहेमालिकेत सर्वसामान्यांच्या आयुष्यातील संघर्षआनंद आणि विजयाचा अर्क अतिशय सुंदररीत्या टिपण्यात आला आहेमालिकेने तीन वर्षांचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहेप्रभावी कथाकथनाचे आदर्श उदाहरण म्हणून मालिकेने नाव कमावले आहे.मालिकेतील लोकप्रिय कलाकारांत राजेश वागले म्हणून सुमीत राघवनवंदना वागले म्हणून परिवा प्रणतीराधिका वागले म्हणून भारती आचरेकर आणि अंजन श्रीवास्तव हे श्रीनिवास वागलेच्या भूमिकेत झळकत आहेतया कलाकारांनी मालिकेतील व्यक्तीरेखांत प्राण ओतण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहेविविध प्रकारच्या प्रेक्षकवर्गांशी तादात्म्य साधत या कलाकारांच्या प्रभावी कामगिरीने मालिकेच्या व्यापक आवाहनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.गेल्या तीन वर्षांत वागले की दुनिया ही प्रत्येक घरातील आवडती मालिका ठरली आहेकळीच्या सामाजिक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत देशभरातील प्रेक्षकांशी खोलवर तादात्म्य साधण्याच्या कटिबद्धतेमुळे मालिका खूप यशस्वी ठरली आहेस्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यापासून ते मानसिक आरोग्याच्या चिंतांवर मालिकेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहेसमाजातील सामान्य सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधून घेत वागले की दुनियाने सातत्यपणे वैचारिक भूमिका मांडली आहेत्याचेच प्रतिबिंब उमटून आशयगर्भ चर्चांत सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना मुद्दे मिळत गेले आहेतआपल्या तीन वर्षांच्या अतुलनीय प्रवासात आनंद आणि उत्सव साजरा करत मालिका आणखी हृदयस्पर्शी क्षणजवळीक साधणारे विचार मांडण्याचे आश्वासन देत आहेखरोखरीच महत्त्वाच्या सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मालिका आपली वचनबद्धता कायम ठेवण्याचे आश्वासन देत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …