no images were found
वॉलमार्ट फाउंडेशनने महाराष्ट्रातील शेतीला बळकटी देण्यासाठी तीन धोरणात्मक अनुदानांची घोषणा केली
मुंबई – वॉलमार्ट फाउंडेशनने आज बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्लूओटीआर) आणि कलेक्टिव्ह गुड फाऊंडेशन (सीजीएफ) सह एकूण $3 दशलक्ष पेक्षा जास्त नवीन अनुदान जाहीर केले. या अनुदानांचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील शाश्वत कृषी पद्धतींद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आहे.
वॉलमार्ट फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा ज्युली गेहर्की म्हणाल्या, “आम्ही नॉन-प्रॉफिटला अशा प्रकारे समर्थन देतो जे फील्डच्या पलीकडे जाते. बदल घडवून आणण्यासाठी अनुदान देणाऱ्यांच्या क्षमतेमध्ये गुंतवणूक करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या अनुदानांद्वारे, आम्ही स्थिति स्थापक, सुलभ आणि सर्वसमावेशक अशी शेती परिसंस्था तयार करण्यात मदत करत आहोत, ज्यामुळे प्रत्येक शेतकरी, विशेषत: स्त्रिया, तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा वापर करून पीक वाढवू शकतील आणि त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतील
ही तीन अनुदाने वॉलमार्टला शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) बळकट करण्यासाठी आणि भारतातील ग्रामीण भागातील कृषी समुदायांना अधिक मजबूत, शाश्वत आणि न्याय्य कृषी क्षेत्रांची स्थापना आणि देखभाल करण्यास सक्षम करण्यासाठी स्थानिक अनुदानधारकांना मदत करतात. फाऊंडेशनच्या सतत वचनबद्धतेची पुष्टी करतात. हा उपक्रम हवामानाला अनुकूल शेती, सुधारित मूल्य साखळीद्वारे उपजीविकेला चालना देण्यावर आणि शेतीमध्ये महिलांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतो. महाराष्ट्रातील ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणि पुनर्प्राप्ती सक्षम करणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.