no images were found
विभागीय फुटबॉल स्पर्धेत न्यू पॉलिटेक्निक विजेते
कोल्हापूर (प्रतिनिधी): चंदगड येथे झालेल्या इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या संघाने शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर या संघावर २-० गोलफरकाने मात करत दिमाखात विजेतेपद पटकावून विभागीय फुटबॉल स्पर्धांतील आपले वर्चस्व कायम राखले. या संघाची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत या संघाने उपउपांत्य फेरीत संत गजानन महाराज पाॅलिटेक्नीक महागाव संघावर १-० तर उपांत्य फेरीत संजीवन पाॅलिटेक्नीक पन्हाळा संघावर २-१ गोलफरकाने मात केली.
विजयी संघात ॠषिकेश गायकवाड, राजवर्धन गायकवाड, संदेश चौगुले, ओंकार ताते, रजत मुळे, यश साळुंखे, जोतिरादित्य साळोखे, सिद्धेश गोरे, सार्थक सरनाईक, आयुष मोरे, सुर्यजीत साळोखे, अवधूत चिले, साईप्रसाद कापूसकर, समर्थ आडनाईक, सार्थक खाडे व रूद्र जरग या खेळाडूंचा समावेश होता.
सदर खेळाडूंना रमेश पाटील, अमित पाटील यांचे प्रशिक्षण, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.