Home सामाजिक मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत लाभासाठी 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत लाभासाठी 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

2 min read
0
0
23

no images were found

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत लाभासाठी 9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

 

कोल्हापूर:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये लाभ मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय विचारेमाळ, कोल्हापूर कार्यालयाकडे अर्ज करावा. इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज 9 फेब्रुवारी 2024 अखेर सादर करावेत. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार यावर्षीच्या लाभासाठी केला जाणार नाही. तसेच यापूर्वी म्हणजे सन 2022-23 मध्ये ज्या बचत गटांनी अर्ज सादर केले आहेत व बचत गट पात्र ठरलेले असल्यास अशा बचत गटांनी नव्याने केवळ अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. जाहिरात सन 2023-24 या आर्थिक वर्षात शासनस्तरावरुन प्राप्त होणारे उदि्दष्ट व तरतूदीच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावयाची आहेत.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गट हा पुरुष किंवा महिलांचा असावा. बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती व कृषी विभागाकडे नोंदणी झाल्याबाबतचे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र. स्वयंसहाय्यता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. बचत गटातील सदस्यांचे जातीचे दाखले असणे आवश्यक आहे. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतीलच असावेत. बचत गटातील सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र. (तहसिलदार यांचे) बचत गटातील सदस्यांचे आधार कार्ड असावेत. स्वयं सहाय्यता बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त असावे व आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयं सहाय्यता बचत गटाचे ताळेबंद प्रमाणपत्र असावे. बचत गटातील सभासदाचे रेशन कार्ड ( एकाच कुटुंबातील एकच सभासद असावा) उपलब्ध तरतूदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3 लाख 50 हजार रुपये राहील. त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच 3 लाख 15 हजार रुपये  शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा 10 टक्के म्हणजेच 35 हजार रुपये इतका असेल.

       अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय विचारेमाळ, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231- 2651318 वर संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…