Home Video गणेशोत्सावमध्ये गावभाग येथील राहूल जगताप यांनी माधुरी हत्तीणचा हालता देखावा सादर

गणेशोत्सावमध्ये गावभाग येथील राहूल जगताप यांनी माधुरी हत्तीणचा हालता देखावा सादर

6 second read
0
0
85

no images were found

गणेशोत्सावमध्ये गावभाग येथील राहूल जगताप यांनी माधुरी हत्तीणचा हालता देखावा सादर

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील गावभाग येथील वास्वव्यास असलेले राहूल जगताप व कुटुंबीयांनी यावेळी गणेशोत्सावामध्ये आपल्या सर्वांची लाडकी माधुरी हत्तीण यावर सामाजिक संदेश देणारा हालता देखावा सादर केला आहे. या देखाव्यामधून त्यांनी माधुरी हत्तीणचा नांदणी मठ ते वनतारा याचा प्रवास दाखविला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी सामन्य लोकांची माधुरी हत्तीण बददल असलेली भावना व्यक्त केलेली आहे.

गणेशोत्सव काळामध्ये ठिकठिकाणी अभिनव उपक्रम चालू आहेत याची दखल घेत जगताप कुटुंबीयांनी यावेळेचा गणेशोत्सव सामाजिक बांधीलकी जपत करण्याचा मानस केला व सगळयांच्या जिव्हाळयाचा विषयास त्यांनी यावेळी देखाव्याच्या रुपाने मांडणी केली. या देखाव्यात त्यांनी नांदणी मठाचे द्वार दाखवले असून त्या द्वारातून माधुरी हत्तीण बाहेर पडते त्यासोबत नांदणीचे भटटारक महराज यांची प्रतिकृती दाखविली आहे तर नांदणी गावातील ग्रामस्थांनी हार घातलेले दृश्य दाखविली आहेत तर सामन्य नागरिक यांनी हातामध्ये बोर्ड धरुन आपल्या लाडक्या माधुरीबददल आपले भाव त्या बोर्डांच्या माध्यामातून समाजासमोर मांडले आहेत तर दुस-या बाजुला वनताराचे जंगल दाखवले असून तेथे इतर प्राणी दाखवले आहेत. अशे सर्वसामन्य नागरिकांचे भाव लाडक्या माधुरी हत्तीणीबददल जगताप कुटुंबीयांनी समाजासमोर मांडले आहेत.

एखादया प्राण्यांबददल एक चांगला संदेश दयायच्या हेतून हा देखावा सादर केला आहे जेणेकरुन हा भाव न्यायदेवतेला मान्य होईल व आपली माधुरी हत्तीण नांदणीमध्ये लवकर वास्तव्यास येईल या हेतुने या देखाव्याचे सादरीकरण केले आहे. सदर देखाव्यास नागरिकांतून चांगला प्रतिसाद देखील येत आहे. हा देखावा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रितम पाटील, किरण लंगोटे, संजय जगताप, अविनाश दत्तवाडे, सार्थक जगताप, हर्षवर्धन जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…