no images were found
प्रजासत्ताक दिन: राष्ट्राभिमान व देशभक्तीचे एकीकरण
दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय उत्साहात व जल्लोषात प्रजासत्ताक दिन साजरा करतात आणि अभिमान व्यक्त करतात. आपण ध्वजारोहण करतो, राष्ट्रगीत गातो आणि परेडमध्ये सहभाग घेतो, ज्यामधून आपला इतिहास प्रकट होण्यासह उज्ज्वल भविष्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. या दिवशी अभिमानाने ‘जय हिंद‘च्या घोषणा दिल्या जातात. प्रजासत्ताक दिन साजरीकरणाबाबत सांगताना एण्ड टीव्ही कलाकार त्यांचा राष्ट्राभिमान व देशभक्ती व्यक्त करत आहेत. हे कलाकार आहेत आशुतोष कुलकर्णी (कृष्णन बिहारी वाजपेयी, ‘अटल‘), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन‘) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है‘). एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल‘मध्ये कृष्णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे आशुतोष कुलकर्णी म्हणाले, ”प्रजासत्ताक दिनाला अभिमान व देशभक्ती दिसून येते. हा दिवस आपल्या देशाच्या अविश्वसनीय गाथेला आणि आपल्याला एकत्र ठेवणाऱ्या सामायिक मूल्यांना उजाळा देतो. या दिवशी तिरंगा उंच फडकावला जातो, ज्यामधून आपल्या देशामधील एकता व विविधता दिसून येते. मी टेलिव्हिजनवर सेलिब्रेशन्स पाहण्याचा आनंद घेते, ज्यामध्ये आपल्याला लोकशाहीचा अधिकार मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाला मानवंदना वाहिली जाते. प्रजासत्ताक दिन आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची तत्त्वे जपण्याच्या सामूहिक जबाबदारीची आठवण करून देतो. आपल्या देशाच्या संविधानाने आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा आणि संधींचा मला अभिमान वाटतो. माझ्याकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप–खूप शुभेच्छा!”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मध्ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ”प्रजासत्ताक दिन हा अभिमान बाळगण्याचा, बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि आपल्याला एकत्र ठेवणाऱ्या व देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या मूल्यांची प्रशंसा करण्याचा दिवस आहे. आपले संविधान या दिवशी लागू झाले, नागरिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, जो आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आपल्या देशाचे मार्गदर्शन करणाऱ्या तत्त्वांची आठवण करून देतो. हा दिवस आपल्या देशाच्या एकता व प्रगतीच्या दिशेने सहयोगात्मक प्रवासाचे प्रतीक आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!” एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है‘मध्ये अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्हणाल्या, ”प्रजासत्ताक दिन राष्ट्राभिमान व देशभक्तीची भावना जागृत करतो. ध्वजारोहण कार्यक्रम, देशभक्तीपर गाणी आणि देशभरात आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम भारताची ओळख आणि लोकशाही आदर्शांप्रती स्थिर समर्पिततेची आठवण करून देतात. या दिवशी भारताचे संविधान लागू करण्यात आले. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसेनानींची आठवण करून देतो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानांचा सन्मान करतो. या दिवशी अनेक कार्यक्रम व समारोह आयोजित केले जातात, ज्यामध्ये विविध पार्श्वभूमींमधील लोक एकत्र येतात आणि विविधतेमध्ये एकतेचे सार दाखवतात. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद!”