Home क्राईम इमारतीची लिफ्ट कोसळून आठ मजूरांचा मृत्यू; एक जखमी

इमारतीची लिफ्ट कोसळून आठ मजूरांचा मृत्यू; एक जखमी

0 second read
0
0
159

no images were found

इमारतीची लिफ्ट कोसळून आठ मजूरांचा मृत्यू; एक जखमी

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये  एका इमारतीच्या बांधकामावेळी लिफ्ट कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अहमदाबादमधील विद्यापीठाजवळ एका इमारतीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली यामध्ये सात मजुरांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. अस्पायर-2 नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…