Home राजकीय गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार?

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार?

0 second read
0
0
309

no images were found

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, आठ आमदार भाजपात प्रवेश करणार?

पणजी : गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्यापैकी मायकल लोबो, दिगंबर कामत, दियालया लोबो, राजेश फळदेसाई, रदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर हे आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी तसे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मायकल लोबो, दिगंबर कामत आणि आठ आमदार जुलै महिन्यातच भाजपात प्रवेश करणार होते. तेव्हा, काँग्रेसने कामत आणि लोबो यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. तसेच, काँग्रेसने लोबो यांची विरोधीपक्ष नेते पदावरून हकालपट्टी देखील केलेली. देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ अभियानाची सुरूवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथून या यात्रेची सुरूवात झाली. त्यात आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…