no images were found
मागासवर्गीय विद्यार्थिनीची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मोफत वसतिगृह प्रवेश
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहामार्फत समाजातील मागासवर्गीय विद्यार्थिनीची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत वसतिगृह प्रवेश देण्यात आहेत.
शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मध्ये इयत्ता 8 वी ते वरिष्ठ, कनिष्ठ, व्यवसायिक मध्ये शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूर शहर व परिसरामधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थिनीना मोफत शैक्षणिक सोईसुविधा पुरवण्यात येतात.
कोल्हापुरातील वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीनी सहाय्य आयुक्त, समाज कल्याण विभाग व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी, कसबा बावडा, दूरध्वनी क्र. 0231- 2680945, मो. नं. 9823192026, 9881689733 या कार्यालयाशी संपर्क साधावा,
मराठी कॉलनी वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीनी सहाय्य आयुक्त, समाज कल्याण विभाग व मागासवर्गीय व मागसवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, ग्रामीण मराठा कॉलनी, कसबा बावडा कोल्हापूर दूरध्वनी क्र. 0231-2600644, मो. 9823192026, 9881689733 या कार्यालयाशी संपर्क साधावा,
इचलकरंजी येथील वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीनी सहाय्य आयुक्त, समाज कल्याण विभाग व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जवाहरनगर, स्टेशन रोड, डॉ. बडे च्या समोर, राजदूत हॉटेल शेजारी, इचलकरंजी मो. नं. 7219365006 या कार्यालयाशी संपर्क साधावा.
हातकणंगले येथील वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीनी सहाय्य आयुक्त, समाज कल्याण विभाग व मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागसवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, ग्रामीण रुग्णालय शेजारी, माळरान हातकणंगले, मो. 9421077266 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीम. एस. ए. गडकरी यांनी कले आहे.