no images were found
सासणे मैदान येथील वॉकिंग ट्रॅक व विद्युत व्यवस्था कामाचा शुभारंभ;श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून रु.७० लाखांचा निधी
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : कोल्हापूर शहरात मैदानांची असणारी अत्यल्प संख्या आणि मैदानांची झालेली दयनीय अवस्था यामुळे खेळाडूंसह अबाल वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी आदी परिसरातील नागरिक, खेळाडूंच्या दैनंदिन सराव, व्यायामासाठी उपलब्ध असणाऱ्या एकमेव सासणे मैदानाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे. याबाबत भागातील स्थानिक नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांना मैदानामध्ये सराव व व्यायामासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर प्रत्यक्ष जागेची पाहणी करून निधी मागणी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून सासणे मैदान येथे वॉकिंग ट्रॅक व विद्युत व्यवस्था करणे या कामास रु.७० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ आज स्थानिक शिवसेना पदाधिकारी व मान्यवर नागरिकांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी परिसरातील नागरिकांनी निधी मंजूर केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख विश्वजित मोहिते, उपशहरप्रमुख राज जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, महिला आघाडी संघटिका मंगल कुलकर्णी, उद्योजक प्रसाद कामत, शिवसेना विभागप्रमुख मुकुंद सावन, वेद देसाई, स्वप्नील मिठारे, सचिन जाधव, कौस्तुभ उपाध्ये आदी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.