Home सामाजिक ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘ग्राममंत्रालय’ पुस्तक उपयुक्त ठरेल’ – शंकर केंबळकर

ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘ग्राममंत्रालय’ पुस्तक उपयुक्त ठरेल’ – शंकर केंबळकर

0 second read
0
0
23

no images were found

ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘ग्राममंत्रालय’ पुस्तक उपयुक्त ठरेल’ – शंकर केंबळकर
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासुनच्या अठ्ठावीस वर्षाच्या काळात ग्रामसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचे वस्तुनिष्ठ शब्दांकन आपण ‘ग्राममंत्रालय’ या पुस्तकाच्या रूपाने वाचकवर्गासमोर आणले आहे .ग्रामीण विकासाचा ध्यास असणारे लोकप्रतिनिधी ,ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्याना या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल ,’ असा विश्वास या पुस्तकाचे लेखक आणि निवृत्त ग्रामविकास अधिकारी शंकर केंबळकर यानी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला . या पुस्तकाचा विषय आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यानी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेतील आपल्या दालनात या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले ,ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे केंबळकर यानी या पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले .ज्या जिल्हा परिषदेत आपण कार्यरत होतो तेथील आय ए एस दर्जाचे अधिकारी असलेल्या व्यक्तीने वयाच्या ८७ व्या वर्षी आपण केलेल्या कामाची नोंद घेतली ही आपल्या कामाची पोचपावती असल्याचे उदगार त्यानी काढले. स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक प्रा जॉर्ज क्रुझ यानी ग्रामीण भागातील वाडयावस्त्या आणि खेड़ी स्वयंपूर्ण करायची असतील ,तर शंकर केंबळकर यानी आपल्या पुस्तकात नोंदवलेली निरीक्षणे आणि तपशीलवारपणे सूचवलेल्या उपाय योजना उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला . शासनाच्या कुठल्याही निधीवर अवलंबून न राहता ग्रामीण भाग स्वयंपूर्ण आणि सशक्त करण्यासाठी लेखक केंबळकर यानी सूचवलेल्या योजना अत्यंत प्रभावी असल्याचे मत जॉर्ज क्रुझ यानी व्यक्त केले .२८ वर्षे जिल्हा परिषदेत ग्रामसेवक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली असल्याने ग्रामविकासाच्या त्यांच्या कल्पना पुस्तक रूपाने नेमक्या रीतीने मांडल्या गेल्याने त्याचा भविष्यात निश्चित रूपाने उपयोग होऊ शकेल,असा दावा त्यानी केला .शाहू छत्रपती फाउंडेशनचे सचिव जावेद मुल्ला यानी आभार मानले .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…