
no images were found
बिग बी यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो;
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासातील अनेक किस्से त्यांच्या ब्लॉगवर शेअर करत असतात. नुकत्याच पोस्ट केलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच्या गोड आठवणी सांगितल्या. तसेच एक जुना फोटो शेअर केला, ज्यात रेखा, राज कपूर, विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, रणधीर कपूर, मेहमूद आणि शम्मी कपूर यांच्यासह ७० च्या दशकातील दिग्गज दिसत आहेत.
फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातात माइक दिसतोय आणि ते प्रेक्षकांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहेत, तर विनोद खन्ना, कल्याण आणि राज कपूर त्यांच्यासोबत स्टेजवर उभे आहेत. या फोटोत रणधीर कपूर, मेहमूदही दिसत आहेत. दूर कोपऱ्यात शम्मी कपूर आणि रेखा उभे आहेत. सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींने एका छताखाली एकत्र आणणारा हा कदाचित लाइव्ह कार्यक्रम असावा असं दिसतंय.
अमिताभ बच्चन यांनी रविवारी रात्री हा फोटो शेअर केला, पण त्या फोटोमागची गोष्ट नंतर सांगणार असल्याचं त्यांनी लिहिलं. रविवारी रात्री हा फोटो आपल्या ब्लॉगवर शेअर करताना ते म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी गोष्ट आहे… ती कधीतरी सांगेन.”