no images were found
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रवेश सूचना
पदवीप्राप्त आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की विद्यापीठ अनुदान आयोग यु.जी.सी, नवी दिल्ली योजनेअंतर्गत एस.सी, एस.टी, ओबीसी, ई.डब्ल्यू.एस (नॉनक्रिमिलेयर) व अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द आणि जैन) आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरिता शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सन 2022-2023 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत- सदर अर्ज शिवाजी विदयापीठाच्या संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in) युजीसी सेंटर फॉर कोचिंग फॉर कॉम्पेटिटिव्ह एक्सामीनेशन्स वर आणि केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध् आहेत.
दि- 21 सप्टेंबर 2022 पर्यत प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रासहित केंद्रांच्या (Email ID-cceis@unishivaji.ac.in) वर पाठवून दयावेत. तसेच केंद्राच्या कार्यालयात सकाळी 10.30 ते सायं 6.00 पर्यंत जमा करावेत. प्रवेश परीक्षा ही दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी दु. 12.00 ते 1.30 या वेळेत ऑफलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मानव्यशास्त्र इमारत, शिवाजी विद्यापीठात घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.