
no images were found
श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी वतीने मंदीर स्वच्छ अभियान;
इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदीर स्वच्छ अभियान राबविण्यात आवाहनाला प्रतिसाद देत स्वत: सहभागी होत प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार सुरेशराव हाळवणकर साहेब शहराध्यक्ष पै अमृत भोसले युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश दादा बुगड यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्राचीन विठ्ठल मंदिर मंदीराची स्वच्छता करून या अभियानाला सुरूवात केली.
अयोध्येतील राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांनी सर्व तीर्थ क्षेेत्रे, मंदीरांमध्ये २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहिम राबवून श्रमदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे. त्यानुसार इचलकरंजीसह ग्रामीण परिसरातील मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे, स्वच्छता अभियानांतर्गत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्राचीन विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, मखतुम दर्गा ,संत रोहिदास समाज मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते युवा मोर्चाचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या