
no images were found
बिग बी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
.
बाॅलिवूडचे बिग बी आर्थातच अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयातून कलेची छाप सोडत प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. आज देखील अमिताभ बच्चन यांची भूमीका असलेले चित्रपट लोक पाहतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आपल्या चाहत्यांसाठी अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी तसेच प्रोफेशनल लाईफबदल पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान, त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या तब्येतीबदल सांगितलंय.
अमिताभ बच्चन त्यांच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. शिवाय अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये स्वतःची टीम त्यार केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक ब्लाॅगमध्ये माहिती शेअर केली आहे.
अमिताभ बच्चनने ब्लाॅगमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हाताला पट्टी लावलेली दिसत आहे. तर हाताला काळ्या रंगाची पट्टी का लावली? याचं कारण खुद्द अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.
हाताची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दिली आहे. बिग बी यांच्या शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. पण आता अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग साठी जाहिरात देखील शूट केली आहे. बिग बी यांनी अभिनेता अक्षय कुमार आणि सुर्या यांच्यासोहत जाहिरातीचं शुटिंग केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.