
no images were found
प्लॅस्टीक श्रेडर मशिनद्वारे साडे सातकिलो प्लॅस्टीक जमा
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरात पाच ठिकाणी बसविण्यात आलेल्या प्लॅस्टीक श्रेडर मशिनद्वारे 15 ऑगस्ट पासून आज अखेर साडे सात किलो प्लॅस्टीक जमा झाले आहे. हे प्लॅस्टीक महापालिकेच्यावतीने करण्यात येणा-या डांबरी रस्त्यांच्या कामामध्ये वापरण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहर हे एैतिहासिक शहर असलेने शहरात मोठया प्रमाणात पर्यटक येतात. पर्याटकांना रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या टाकण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत आहे. भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे प्लॅस्टिक वेस्ट (मॅनेजमेंट ऍ़ण्ड हॅण्डलिंग) रुल्स केलेले आहेत. यानुसार महानगगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दैनंदीन निर्माण होणारा प्लॅस्टीक कचऱ्यासाठी प्लास्टिक श्रेडींग मशिन दि.15 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या निरूपयोगी प्लास्टीक कचऱ्याचा रस्ते बांधणीचे कामामध्ये वापर करणेच्या अनुषंगाने हे श्रेडर मशिन महापालिकेच्यावतीने बसविण्यात आले आहेत. हि मशिन्स शहरामध्ये बिंदु चौक पार्किग, महालक्ष्मीमंदिर परिसरात, रेल्वे स्टेशन, केशवराव भोसले नाटयगृह व रंकाळा चौपाटी या प्रामुख्याने वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात आली आहेत. हि मशिन खरेदी करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून 14 लाखाची तरतूद करण्यात आली होती. यासाठी 14 निविदा प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये बायोक्रुक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सर्वात कमी दराने रु.9.80 लाखाची पाच मशिन उपलब्ध करुन दिलेली आहेत. या मशिनद्वारे क्रशिंग होणारे प्लॅस्टीक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये करण्यात येणा-या रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येणार आहे.