
no images were found
भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास शिंदे यांचे ‘बांधावरील झाड’ या विषयावर व्याख्यान
कोल्हापूर(प्रतिनिधी): भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामार्फत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी “पुस्तकांवर बोलू काही” हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना निमंत्रित केले आहे.
मोबाईलच्या या दुनियेत पुस्तकाचे वाचन मागे पडत चालले आहे. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. विचारांची देवाणघेवाणच बंद होत चालली आहे. यामुळे लोकांच्या मध्ये संवादही नीट होताना दिसत नाही. यासाठी चिकोडे ग्रंथालयामार्फत “हरवत चाललेला संवाद, पुन्हा सुरू करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ”
ग्रंथालया मार्फत शनिवार दि.13 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4.45 ते 6.00 यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. विज्ञान साहित्यिक म्हणून लोकप्रिय असणारे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचीव डॉ. विलास शिंदे.यांचे पर्यावरण, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यावर लेखन प्रसिद्ध आहे.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.