no images were found
सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्यावतीने व्यवस्थापन विकास कार्यक्रम चे आयोजन
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने व्यवस्थापन विकास कार्यक्रम (Management
Development Programme) चे आयोजन शिक्षणशास्त्र सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे मंगळवार , दिनांक १६ जानेवारी,२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बिगर शासकीय संघटना, तिचे कार्य व स्वरूप, बिगर शासकीय संस्थांना मिळणारे अर्थसहाय्य, विविध विकासात्मक प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील संस्था, बिगर शासकीय संस्थांना मिळणारे शासकीय अर्थसहाय्य आणि शासनाची भूमिका, अर्थसहाय्यासाठी प्रकल्प अहवाल कसा तयार करावा?, संस्थात्मक सभा व कार्यक्रम इत्यादींचे अहवाल लेखन, संस्थेचे आर्थिक नियोजन व वार्षिक लेखापरीक्षण अहवाल इत्यादींबाबत या विषयातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्यातील तसेच बाहेरील विविध संस्था, संघटना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. एस. एस. महाजन व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.