Home शासकीय शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा 

शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा 

4 second read
0
0
30

no images were found

शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा 

कोल्हापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतंर्गत शेतक-यांसाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा राबविण्यात येत आहे. फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इ. बाबत प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे सातबारा, 8 अ, आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.

दौ-यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान जाणुन घेता येणार आहे. या कार्यक्रमांतंर्गत राज्यात फलोत्पादन शेतक-यांसाठी तसेच शेतक-यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतुने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या मध्यामातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समुहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे यासाठी शेतक-यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. भिंगारदेवे यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…